गेल्या काही दिवसांत राज्याला पावसाने झोडपले. त्यामुळे बहुतांश भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी भूस्खलन होण्याचे प्रकारही झाले. दरम्यान, मुसळधार पावसात मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना वारंवार घडत असतात. या परिस्थितीशी मुंबईकर जिद्दीने सामना करत आपले जीवन जगत आहेत. मुंबईकरांनी स्वतःला या परिस्थितीशी एकरूप करून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण पावसाळ्याच्या काळात दैनंदिन जीवनातील एक सामान्य समस्या म्हणजे कपडे न सुकणे. अनेक प्रयत्न करूनही आपल्यापैकी प्रत्येकालाच या समस्येचा सामना करावा लागला असेल. पण मुंबईकरांनी या समस्येवरही मात करत एक जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दादरमुंबईकर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलचा एक डब्बा आपण पाहू शकतो. या डब्यामध्ये लोक अगदी शांतपणे बसलेली आहेत. पण हा व्हिडीओ बनवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या डब्यामध्ये सुकत घातलेले कपडे. काही लोकांनी, पावसात भिजलेल्या शाल ट्रेनच्या डब्यामध्ये सुकत घातलेल्या आपण पाहू शकतो.

MDH मसाल्यांना मिळाला नवा चेहरा; जाणून घ्या जाहिरातीत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “हे फक्त मुंबईतच घडू शकतं.” प्रत्येक खडतर परिस्थितीत ‘जुगाड’ शोधल्याबद्दल अनेकांनी मुंबईकरांचे कौतुकही केले. एका यूजरने कमेंट केली आहे, “कितने तेजस्वी लोग हैं,” तर दुसऱ्याने लिहिले, “मैने पहले बार देखा.” तर इतरांनी हसण्याच्या इमोजी कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video people put clothes to dry in mumbai local train compartment pvp