Viral Video: आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांचा ३ इंडियट्स चित्रपट खूप गाजला. अनेकांना या चित्रपटामुळे त्यांच्या कॉलेजचे दिवस आठवले. तर बऱ्याच जणांना आयुष्य जगण्यासाठी नवा विचार मिळाला. ३ इंडियट्समधील अनेक सीन्स इतके लोकप्रिय झाले की लोकांना ते तोंडपाठ झाले. त्यात ‘ऑल इज वेल’ ही नवी संकल्पना लोकांमध्ये रुजली. या चित्रपटातला एक सीन पाहून बरेचसे लोक आजही पोट धरुन हसतात. तो सीन म्हणजे जेव्हा आमिन खानने साकारलेला रॅन्चो हा त्याच्या मित्रांच्या आजारी वडिलांना स्वत:च्या प्रेयसीच्या स्कूटीवरुन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. ३ इंडियट्समधल्या या सीनसारखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये ३ जण एका स्कूटीवर एकमेकांना चिपकून बसले आहेत असे दिसते. यातील २ जणांनी हेल्मेट घातले आहे. हेल्मेट घातलेल्या दोन माणसांच्या मध्ये एक वयस्कर आजोबा बसलेले आहेत. सर्वात मागे बसलेल्या व्यक्तीने स्कूटी चालवणाऱ्याच्या खांद्यांवर दोन्ही हात ठेवले आहेत. तर मध्ये बसलेल्या आजोबांनी स्कूटीचा मागचा स्टॅंड पकडला आहे. त्यांच्याकडे पाहून ३ इंडियट्स मधल्या सीनची आठवण येते, ज्यात रॅन्चो आणि प्रिया स्कूटीवरुन राजूच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जात असतात.

आणखी वाचा – लहानपण देगा देवा! हरवलेल्या कोकराला त्यांच्या आईपर्यंत पोहचणाऱ्या मुलाची निरागसता पाहून नेटकरीही भारावले, म्हणाले..

@shalukashyap28 या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘खऱ्या आयुष्यातील ३ इंडियट्स’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एकाने ‘कम्मोचं लग्न ठरलं आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘आजोबांनी प्राणपणाने स्कूटीचे हॅन्डल पकडून ठेवले आहे’ असे म्हटले आहे.