सध्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा उपयोग विविध कामांसाठी होतो.अगदी लागवडीपूर्वी शेताची पूर्वमशागत असो किंवा पिकांची आंतरमशागत तसंच काढणीपर्यंतची कामेही अनेक यंत्रांच्या मदतीने केले जातात. शेतीच्या कामासाठी वेगळ्या प्रकारची उपयुक्त यंत्र विकसित करण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कामे सुसह्य होऊन वेळ आणि पैशांची देखील बचत होण्यास मदत होते. अशाच एका शेतकऱ्याने गहू कापणीसाठीची एक मशीन तयार केलीय. या मशीनने एका सेकंदात गहू कापला जातोय. तुम्हाला विश्वास नसेल होत तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आपल्या भारतात गव्हाचे सर्वात जास्त पीक घेतलं जातं. वाढत्या महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना गहू काढणीसाठी मोठ-मोठे यंत्र खरेदी करणं शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणून एका शेकऱ्याने गहू काढणीसाठी एक यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळे गहू काढणीचं काम खूपच सोपं झालंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शेतकरी गहू कापणीचं काम करताना दिसून येतोय. त्याच्या हातात एक यंत्र आहे आणि ते यंत्र पीकांवर भिरकावलं की दुसऱ्या सेकंदाला गहू कापणी होतेय. त्याच्या हातात जे यंत्र दिसतंय ते खूपच वेगळं आहे. 

farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
shocking video Viral
रीलसाठी ओलांडली मर्यादा! मांजरीला बांधून श्वानापुढे टाकलं अन्… थरकाप उडवणारा VIDEO पाहाच
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

आणखी वाचा : ‘या’ ठिकाणी झाला जगातला रेकॉर्डब्रेक पाऊस, कोणतं आहे ठिकाण, इतक्या पावसात कसं दिसतं दृश्य? पाहा हा VIRAL VIDEO


या यंत्राच्या तळाशी एक धारदार विळा आहे आणि वरच्या बाजूला पीक गोळा करण्यासाठी गाळ्यासारखे विणलेले काम केले आहे. यामुळे ते पीक लवकर कापून गोळा होतंय. हा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर @TansuYegen नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनोख्या यंत्राचा हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्याने पाहत आहेत. तसंच हे यंत्र तयार करण्याच्या कल्पकतेला लोक दाद देताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. 

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “ताई, माझ्या गाडीचा धक्का सुद्धा लागला नाही…!” स्कुटीवरून स्वतःच पडली अन् मागच्या बाईकस्वारावर चिडली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या शिक्षिकेचा ‘झुमका बरेली वाला’वर डान्स, बड्या बड्या हिरोईन्सही पडतील फिक्या


हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच ३७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर काही लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. याला त्यांनी मोठा जुगाड म्हटलंय. तसंच तानसू येगेनने स्वतः व्हिडीओवर कॅप्शन देत तो शेअर केलाय. ‘परंपरा आणि आधुनिकता यांच्यात गव्हाची कापणी’ असं या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय. 

Story img Loader