Viral Video: उन्हाळ्यात माणसांना जशी पाण्याची गरज असते तशीच प्राण्यांनादेखील असते. या दिवसांमध्ये प्राण्यांना थंड आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावे लागते. पुरेसे पाणी मिळाल्याने पाळीव प्राणी निरोगी, हायड्रेटेड व आनंदी राहतात. पण, रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना अनेकदा अन्न-पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; त्यात उन्हामुळे तहानलेल्या श्वानाची अगदी खास पद्धतीनं तहान भागवली जात आहे.
व्हायरल व्हिडीओ पेट्रोल पंपाचा आहे. एक तहानलेल्या आणि गरमीमुळे व्याकुळ श्वान पाण्याच्या शोधात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याजवळ येतो आणि नकळत त्याला पाणी देण्याचा आग्रह करताना दिसतो. तेव्हा कर्मचारी त्याच्या शेजारी असणाऱ्या पिंपातून श्वानाला पाणी देताना आणि त्यांच्या अंगावर पाणी उडविताना आणि श्वानदेखील या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे. थंड पाण्यात खेळणाऱ्या श्वानाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पाहाच.
हेही वाचा…निरोगी राहण्यासाठी तुमच्या मुलांना ठेवा ‘या’ सवयींपासून दूर; डॉक्टरांनी दिला सल्ला, पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, काम करणारा कर्मचारी एका पिंपातून पाणी घेऊन श्वानावर उडविताना दिसत आहे. एकदा पाणी उडविल्यावर तो वारंवार पाणी उडविण्यास सांगतो आहे आणि पिंपाजवळचं ठाण मांडून उभा राहतो. जितक्या वेळेस व्यक्ती पिंपातून पाणी उडवतो तितक्या वेळेस श्वान आनंदात उड्या मारताना दिसत आहे.
सोशल मीडियावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी हा व्हिडीओ पहिला आणि @sudhirkudalkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्तीच्या श्वानाबद्दलच्या नि:स्वार्थी प्रेम आणि करुणेबद्दल कमेंटमध्ये कौतुक केले आहे; जे सोशल मीडियावर अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.