Viral video: सध्या सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षांचे अपघाती जीव गेल्याचे व्हिडीओ आपण पाहत असतो. कधीकधी शुल्लक कारणामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. मात्र, काही पशुप्रेमी संकटात सापडलेल्या पक्ष्यांना जीवदान देत असतात. प्रसंगी आपला जीव संकटात टाकून ते पक्ष्यांची मदत करत असतात. सध्या अशाच एका व्यक्तिनं दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अजून माणुसकी जिवंत!
सोशल मीडयावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी काही प्राणी अशा ठिकाणी अडकतात की. त्यांना तिथून बाहेर निघणं किंवा बाहेर काढणं एकदम अवघड असतं. काहीवेळेला अशा प्रसंगी ज्या व्यक्तीच्या ही घटना लक्षात येते, ती लोकं प्राण्यांना मदत करतात. या व्हिडीओमध्येही एका व्यक्तीनं आपल्या जीवाची पर्वा न करता एका पक्षाला मदतीचा हात दिला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेलिकन नावाचा एक पक्षी पाण्यातून माशाची शिकार करतो, मात्र हा मासा त्याच्या चोचीत अडकतो. यावेळी पक्षी घशात अडकलेला मासा बाहेर काढण्यासाठी धडपडत आहे. हे पाहून एक व्यक्ती त्या पक्षाच्या चोचीतला मासा बाहेर काढतो. यानंतर हा पक्षी सुटकेचा निश्वास सोडतो.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: आधुनिक युगातील ‘देसी जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा सुद्धा झाले शॉक, म्हणाले…
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.