जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिंस्त्र श्वापदं येतात. यामध्ये मग वाघ, चित्ता, बिबट्या यांच्यासोबतच जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचाही समावेश असतो. या सर्व जनावरांमुळे जंगलातील वातावरण अगदी भयानक होतं. आपण लहानपणापासून हे ऐकत आलो आहोत, की सिंह जंगलाचा राजा आहे. आपण आतापर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये, डॉक्युमेंटरीजमध्ये किंवा कित्येकांनी तर प्रत्यक्षातही सिंहाला पाहिलं आहे. शरीराने मोठे असलेले प्राणीही सिंहाला घाबरून असतात, तिथे आपल्या माणसांचं काय बोलणार? पण असं असतानाही एक माणूस मात्र एक नव्हे तर दोन दोन सिंहासमोर छातीठोकपणे उभा राहिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांच्या मनात धडकीच भरू लागते. तुम्ही सुद्धा एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.
खरंतर हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयाचा आहे. या प्राणीसंग्रहालयात आलेले काही लोक सिंहापासून भरपूर लांब उभे आहेत, त्यापैकी एकजण हा व्हिडीओ शूट करत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहाच्या शेजारी असलेल्या तलावात एक माणूस उभा आहे, तेवढ्यात एक सिंहीण तिथे येते. सिंहीणीसमोर उभी असताना सुद्धा हा व्यक्ती अगदी निडरपणे तिच्यासमोर उभा असल्याचं दिसून येतंय. जणू काही त्या व्यक्तीचं सिंहीणीसोबत काही जुनं नातं आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : असं कुणी करतं का? कपल डान्स करताना चुकली म्हणून तिला सगळ्यांसमोर मारू लागला…
जेव्हा सिंहीण त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकते तेव्हा तो सिंहीणीकडे बोट दाखवतो, त्याचे धैर्य पाहून सिंहीणही मागे हटते. हे दृश्य पाहून बाहेर उभे असलेले लोक जोरजोरात ओरडू लागले. हा व्हिडीओ फक्त इथेच संपत नाही. ती व्यक्ती सिंहीणीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, तेवढ्यात दुसरा सिंह तिथे येतो.
आणखी वाचा : संतापलेल्या नवरीने ८ लाख रुपयांचे ३२ वेडिंग गाऊन कापले, पाहा हा VIRAL VIDEO
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बोट दाखवून ती व्यक्ती त्या सिंहालाही मागे ढकलते. दोन सिंहांमध्ये अडकलेल्या त्या व्यक्तीला पाहून लोकांचा श्वास रोखून जातो, पण ती व्यक्ती दोन्ही सिंहांसमोर बाहुबली असल्यासारखी उभी असते. आता हे दोन सिंह या व्यक्तीवर हल्ला करणार की काय, अशी भीती मनात वाटू लागते.
आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : आयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
दोन सिंहांना पळवून लावणाऱ्या या व्यक्तीच्या हातात काही हत्यार होते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. खरं तर त्या व्यक्तीने सिंहांना टाळण्याची तीच पद्धत अवलंबली जी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सिद्ध झाले. खरं तर सिंह नेहमी मानेवर हल्ला करतो आणि बहुतेक वेळा मागून हल्ला करतो, पण जर तुम्ही सिंहाशी लढत राहिलात तर कदाचित तो तुम्हाला घाबरेल, पण जर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर सिंह मागून तुमचा पाठलाग करू शकतो.