सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यकारकपणे धोकादायक स्टंट करणारे व्हिडीओ नेटीझन्सना खूप आवडतात. धोकादायक स्टंट करण्यासाठी अनेक जण आपला जीव पणाला लावतात. असे अनेक विचित्र कारनामे करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. अलीकडे असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हालं. व्हिडीओमध्ये हजारो फूट उंचीवर हेलिकॉप्टर हवेतच थांबते, त्यानंतर पायलट धोकादायक पद्धतीने बंद इंजिन सुरू करताना दिसत आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नक्की काय झालं?
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला पायलटचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हजारो फूट हवेत हेलिकॉप्टर उडवताना दिसत आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरचे इंजिन बंद होते. तेव्हाच वैमानिकाच्या बुद्धीने घेतलेला धोकादायक निर्णय त्याचे प्राण वाचवतो. व्हिडीओमध्ये पायलट हेलिकॉप्टरचे इंजिन दुरुस्त करण्यासाठी हवेत हेलिकॉप्टरतून बाहेर पडताना दिसत आहे. हेलिकॉप्टरतून बाहेर पडण्यापूर्वी पायलट स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या शरीराला दोरी बांधतो, दुसऱ्याच क्षणी पायलट हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडतो आणि बाहेर जातो आणि हेलिकॉप्टरचा प्रोपेलर चालवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, प्रोपेलर धावू लागतात आणि ती व्यक्ती विमानात सुखरूप परत येते.
(हे ही वाचा: शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video)
(हे ही वाचा: ड्युटीवर असलेल्या पोलिसाला बैलाने शिंगाने उचलून आपटले, घटनेचा जमिनीवर Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर या व्हिडीओला ९ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहून यूजर्स त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.