पिटबुल कुत्र्यांची दहशत थांबण्याचं काही नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांमध्ये पिटबुलच्या हल्ल्याच्या बातम्यांचा ओघ सुरूच आहे. अशा परिस्थितीत पिटबुलच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत तुम्ही पिटबुलच्या हल्ल्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पिटबुलच्या हल्लाचा नसून चक्क एका पिल्लाचा जीव वाचवल्याचा आहे. होय. आजुबाजूच्या घटना पाहता यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कदाचित अवघड जाईल. पण हे खरंय. याचा व्हिडीओ सध्या लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत.
कुत्रा हा प्राणी मालकाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्याचे मानले जाते. पण जंगली कुत्र्यांच्या काही जातींबाबत असे म्हटले जाते की ते पाळण्यास योग्य नाहीत. याशिवाय घरादाराच्या सुरक्षेसाठी कुत्रे पाळणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक कुत्री केवळ प्राणीप्रेम आणि प्रेमळ साथीदारांसाठी पाळली जातात. तर काही दुर्मिळ शुद्ध जातीच्या कुत्र्यांना शान दाखवण्यासाठी पाळले जातात.
पिटबुल्स त्यांच्या आक्रमक वृत्तीसाठी ओळखले जातात. पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा बलवान कुत्रे मानले जातात. त्यांच्याकडे खूप सक्रिय, शक्तिशाली आणि मजबूत जबडा आहे. धाडसी, निर्भय आणि लढाऊ कुत्रे म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच आता हल्लीच्या घडणाऱ्या घटना पाहता या जातीचा कुत्रा पाळण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या जगभरात पिट बुल्सची प्रतिमा चांगली नाही. ते लवकर आक्रमक होतात आणि हल्ला करू शकतात. त्यांना राग आल्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पण सध्या एका व्हायरल व्हिडीओने लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. कारणही तसंच आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिटबुल एका कुत्र्याच्या पिल्लाला स्विमिंग पूलमध्ये बुडण्यापासून वाचवताना दिसत आहे. न्यू यॉर्क पोस्टनुसार ब्राझीलमधील जार्डिनोपॉलिस येथील एका घरात ही घटना घडली आणि आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीने ती रेकॉर्ड केली. २५ सेकंदांची क्लिप यूट्यूबसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला असून आकडा वाढत आहे. चांगल्या कामासाठी पिटबुलला त्याच्या मालकाकडून कौतुकाची थापही मिळाली.
आणखी वाचा : फिटनेस मॉडेलने पतीऐवजी पालकांनाच असे फोटो पाठवले, माहेरचेही दुरावले
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : याला म्हणतात टीम वर्क! हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…
व्हिडीओ सुरू होताच, कुत्र्याची तीन पिल्ले घरातील स्विमिंग पूलजवळ खेळताना दिसत आहेत. अचानक त्यातील एक पिल्लू स्विमिंग पूलमध्ये पडला. पिल्लू आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत असताना, इतर पिल्ले त्यांच्या मालकाचे लक्ष वेधण्यासाठी भुंकायला लागतात. यादरम्यान, पिटबुल घटनास्थळी धावत आला आणि पिल्लाला वाचवण्यासाठी त्याने तलावात उडी मारली. स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या पिल्लाला हळूवारपणे त्याने आपल्या जबड्यात पकडले आणि पाण्याबाहेर आणले. तोपर्यंत मालकही येतो आणि पिटबुलच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो. पाच वर्षांची अथेना नावाची पिटबुल अनेकदा पूल डेकवरील तिच्या खास जागेवरून लक्ष ठेवते असं देखील मालकाने सांगितले.