ताजमहालच्या नो फ्लाइंग झोनमध्ये सोमवारी संध्याकाळी अत्यंत कमी उंचीवरून विमानाने उड्डाण केल्याचं एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. विमानाचा मोठा आवाज आणि खूप खाली उडत असल्यामुळे लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने या प्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) अहवाल मागवला आहे.

हे विमान ताजमहालच्या एका मीनारावळून गेले आणि स्मशानभूमीकडे वळले, असे सांगण्यात येत आहे. या संदर्भात सीआयएसएफचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक राजकुमार वाजपेयी म्हणाले, ‘ही बाब अद्याप माझ्या निदर्शनास आलेली नाही. असे झाले असेल तर त्याची चौकशी करू.’

Ban, laser light beam, Shirdi airport area,
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
thrat note found bomb in plane from Goa to Mumbai alerting authorities mumbai print news sud 02
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी, गुन्हा दाखल
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Mahakumbh mela 2025 Drone Show fact check video
महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळेल डोळे दिपवणारा भव्य ‘ड्रोन शो’? व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ नेमका कुठला? सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

ताजमहालच्या सुरक्षेत तैनात सीआयएसएफचे कंपनी कमांडंट राहुल यादव सांगतात की, या प्रकरणी आम्हाला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र ज्याप्रकारे पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली, त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ताजमहालच्या आजूबाजूला फ्लाय झोन नसल्यामुळे येथे ड्रोन उडवण्यासही मनाई आहे. अशा स्थितीत ताजमहालजवळ विमानाचे पासिंग सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण करते.

(हे ही वाचा: “गडपती, गजअश्वपती, भूपती…” पावनखिंड चित्रपटाच्या वेळी चित्रपटगृहात शिवगर्जना देणाऱ्या तरुणाचा Video Viral)

ड्रोन आणि विमानांच्या उड्डाणावर आहे बंदी

ताजमहालच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास मनाई आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे, मात्र ताजमहालच्या नो फ्लाईंग झोनची माहिती कोणाकडेही नाही. २०१७ मध्ये, गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाकडून अहवाल मागवला होता. ५०० मीटरच्या त्रिज्येमध्ये ३,००० फूट उंचीपर्यंत नो-फ्लाइंग झोन आणि २,००० मीटरच्या त्रिज्येमध्ये रेग्युलेटेड झोन तयार करण्याचा विचार होता, परंतु अधिसूचना जारी झाली नाही.

(हे ही वाचा: पावनखिंड चित्रपटाच्या वेळी सांगलीच्या चित्रपटगृहात तरुणांनी दिली शिवगर्जना; अंगावर काटा आणणारा Video Viral)

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले की, ताजवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून हे विमान ताजपासून किती अंतरावर आहे हे उघड होत नाही. यावर ताजच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफकडून अहवाल मागवण्यात आला आहे. अहवालानंतरच काही सांगता येईल.

Story img Loader