Viral Video: बालपणीचे दिवस हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात. या दिवसांमध्ये मुलं खेळतात, बागडतात, आयुष्यातील सर्वात सुंदर काळ जगतात. सोशल मीडियावरही लहान मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही मुलं कधी एखादं गाणं गाताना, डान्स करताना किंवा एखादी कला सादर करताना दिसतात. पण, आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये परिस्थितीने गरीब असलेली दोन लहान मुलं असं काहीतरी करत आहेत, जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत. श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकासाठी दोन वेळचे पोटभर अन्न मिळणे ही मुख्य गरज आहे. श्रीमंतांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी दोन वेळचे पोटभर अन्न मिळवणे फार मोठी गोष्ट नाही, परंतु गरीब व्यक्तींसाठी दोन वेळचे अन्न मिळवणे हेच सर्वस्व असते. आपल्याला भविष्यात काय करायचं? कोणती वस्तू विकत घ्यायची आहे, या सर्व गोष्टीपेक्षा आपली भूक भागवण्यासाठी कोणते काम करता येईल, याचा ते विचार करत असतात. आता समोर आलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा: ‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुलं रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खरकट्या ताटातील अन्नपदार्थ गोळा करताना दिसत आहेत. यावेळी दोघेही त्यांच्याकडे असलेल्या भांड्यामध्ये ते ताटातील उरलेलं अन्न काढून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. तसेच या व्हिडीओवर पोटातल्या भुकेने मर्यादा ओलांडली की मग टाकाऊ अन्नाची किंमतही खूप जास्त होते, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_vishwa_96k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader