Indradhanu 2024 Transgender Dhol Tasha Pathak : पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव हे पुण्याचे वैभव आणि संस्कृतीचं प्रतीक मानले जाते. गणेशोत्सवाचे दहा दिवस पुण्यामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील मानाचे पाच गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती यांसह अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात येतात. चौकाचौकांत गणेश मंडळाचे मंडप आणि देखावे उभारले जातात. गणरायाच्या आगमना निमित्त मिरवणूक निघते. मानाच्या गणपती समोर पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांचे वादन सादर केले जाते. पुण्यातील ढोल-ताशा पथकांशिवाय गणेशोत्सव सोहळा पूर्ण होऊच शकत नाही. गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच हे ढोल-ताशा पथक वादनाचा सराव सुरू करतात. पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश होणार आहे. हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील पहिले ढोल-ताशा पथक ठरणार आहे. सध्या तृतीयपंथींचे ढोल-ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिखंडी : पुण्यातील पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक

राज्यातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात हे तृतीयपंथी ढोल-ताशा वादनाचा सराव करताना दिसले. तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन स्वत:च ढोल-ताशा वादन शिकले आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदा तृतीयपंथीदेखील ढोल-ताशा वादन करताना दिसतील.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’

हेही वाचा – Video : ‘ओ ओ जाने जाना..’, सलमान खानच्या गाण्यावर थिरकले आजोबा, भन्नाट डान्स पाहून पोट धरून हसाल

शिखंडी ढोल-ताशा पथकाचे व्हिडीओ व्हायरल

शिखंडी या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाने स्वत:चे अधिकृत इन्स्टाग्राम खाते उघडले आहे, ज्यावर त्यांनी वादनाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे शिखंडी या ढोल-ताशा पथकाने आपले पहिले वादनदेखील सादर केले आहे, ज्याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा – अमेरिकन युट्युबरने खरेदी केला ८४ लाखांचा रोबो डॉग, भुंकताना ओकतोय आग, Video Viral

अथक प्रयत्नानंतर उभारले तृतीयपंथीयांचे पहिले ढोल-ताशा पथक

इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, “शिखंडी हे पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक अथक प्रयत्नांनंतर उभारण्यात आले. हे पथक उभारण्यासाठी अनेकांनी मदत केली आणि मेहनत घेतली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथक नादब्रह्म यांनी खारीचा वाटा उचलला आहे. शिखंडी ढोल-ताशा पथकातील तृतीयपंथी वादकांना नादब्रह्म पथकाने ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले. डॉक्टर रश्मी बापट यांनी ढोल मिळवून दिले. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीदेखील या पथकाला मदत केली.”

हेही वाचा – “माय-बापाचे उपकार आपण फेडू शकत नाही!” आई वडीलांना पाहताच पुण्याचा पोलिस झाला नतमस्तक, Viral Video बघाच

पुणेकरांना प्रत्यक्षात वादन पाहण्याची उत्सुकता

१ सप्टेंबर रोजी शिखंडी ढोल-ताशा पथकाला शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात वादन करण्याची संधी मिळाली आहे. सध्या तृतीयपंथींच्या शिखंडी या ढोल-ताशा पथकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रत्यक्षात या पथकाचे वादन पाहण्याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.