Indradhanu 2024 Transgender Dhol Tasha Pathak : पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव हे पुण्याचे वैभव आणि संस्कृतीचं प्रतीक मानले जाते. गणेशोत्सवाचे दहा दिवस पुण्यामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील मानाचे पाच गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती यांसह अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात येतात. चौकाचौकांत गणेश मंडळाचे मंडप आणि देखावे उभारले जातात. गणरायाच्या आगमना निमित्त मिरवणूक निघते. मानाच्या गणपती समोर पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांचे वादन सादर केले जाते. पुण्यातील ढोल-ताशा पथकांशिवाय गणेशोत्सव सोहळा पूर्ण होऊच शकत नाही. गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच हे ढोल-ताशा पथक वादनाचा सराव सुरू करतात. पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश होणार आहे. हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील पहिले ढोल-ताशा पथक ठरणार आहे. सध्या तृतीयपंथींचे ढोल-ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा