लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही समारंभात खाण्यासाठी लांबच लांब लागलेल्या रांगा तुम्ही पाहिल्या असतीलच. सोशल मीडियावरही (social media) असे अनेक व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे, जो पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. व्हिडीओमध्ये लोक जेवणाच्या इथे भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंजाबमधील एका आलिशान रिसॉर्टचा (Punjab) आहे, जिथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी सरकारी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी शिक्षणातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधला. या चर्चेनंतरचाच हा व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की काय झालं?

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्स वर तुटून पडले. अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, जो रिसॉर्टचा कर्मचारी असावा, त्याने घाईघाईने प्लेट्स एका कोपऱ्यात नेल्या आणि शिक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून एक एक वाटू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. आता या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे.

(हे ही वाचा: ‘लेडी पुष्पा, मैं हटेगी नहीं’ स्कूटीवर स्वार महिलेचा भन्नाट Video सोशल मीडियावर व्हायरल)

(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘अभिजीत गुहा’ नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने मजेशीरपणे लिहिले की, ‘प्रत्येकाला कोंबडा बनवा’. दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘मी हे समजण्यास उत्सुक आहे की दुपारचे जेवण किती वाजता दिले गेले, कारण त्यांना खूप भूक लागली आहे.’

(हे ही वाचा: मां तुझे सलाम! आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणीने लढवली युक्ती; हा viral video जिंकेल तुमचं मन)

शिक्षकांना बैठकीच्या ठिकाणी आणण्यासाठी पंजाब सरकारने एसी बसेसचीही व्यवस्था केली होती. राज्याचे शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षकांच्या सूचना ऐकण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.