लहान लहान कुत्र्याची गोंडस पिल्ले असणारे व्हिडीओ कोणाला आवडत नाहीत? तुम्हाला देखील कुत्र्याची पिल्ले आवडत असतील किंवा असे व्हिडीओ पाहायला आवडत असतील तर हा व्हिडीओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. @hopkinsBRFC21 या अकाउंटवरून रविवारी सकाळी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये ५ ते ६ कुत्र्याची पिल्ले एका माणसाकडून पोहण्याचे धडे गिरवताना दिसून येत आहेत. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडीओ फक्त एकदाच बघून तुमचेही मन भरणार नाही. कारण हा व्हिडीओ खूपच गोड आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक माणूस एका तळ्यात उभा असलेला दिसत असून ही पिल्ले पोहण्यासाठी एका रांगेत शिस्तीत उभी आहेत. तो माणूस पिल्लांवर पाळत ठेवून आहे तसेच त्या पिल्लांना दुसऱ्या बाजूला जाण्यापासून रोखत आहे. अशाप्रकारे ही सर्व पिल्ले पोहण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती या पिल्लांना प्रोत्साहन देत आहे. ‘सर्वांत सुंदर पोहण्याचा धडा’ असे कॅप्शन या व्हिडीओसोबत लिहिले आहे. हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून जवळपास ८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओच्या कंमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. “मोहक! मी पोहण्याचे बरेच धडे शिकवले आहेत पण यासारखे सुंदर नाही. पाण्यात आत्मविश्वास असणे चांगले आहे – छान कामगिरी केली पिल्लांनो.” असे एक वापरकर्ती म्हणाली. तर, “हे छोटे फ्लफबॉल किती सुंदर आहेत?!” असे दुसरी वापरकर्ती म्हणाली. “सुंदर क्षण.” असे तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?

Story img Loader