सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला हसू फुटते. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ एका महाकाय अजगराचा आहे. हा अजगर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अजगराच्या धाडसाला तसेच त्याच्या महाकाय शरीराला पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा विशालकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून येत आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्या चालकांनी देखील त्यांच्या माणूसकीचं दर्शन घडवलं आणि या विशालकाय अजगराला आरामात रस्ता ओलांडून देण्यासाठी आपआपल्या गाड्या जागीच थांबवल्या. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ केरळमधल्या कोची इथला आहे. सीपोर्ट-एयरपोर्ट रोड कक्कनड सिग्नलजवळ रस्त्यावर हा विशालकाय अजगर दिसून आला. हा अजगर वाहनांची ये-जा सुरु असताना भर रस्त्यात आला आहे. तसेच कशाचीही पर्वा न करता तो रस्ता ओलांडत आहे. हा अजगर रस्त्यावर अचानकपणे आल्यामुळे सगळेच लोक गोंधळे आहेत. रस्त्यावर लोकांनी पटापट गाड्या थांबवल्या आहेत. तसंच या अजगराला आरामात रस्ता ओलांडून देण्यासाठी वाट पाहताना दिसून आले.
आणखी वाचा : मुलाने मोबाइल गिफ्ट केल्यानंतर आईचा आनंद अनावर; व्हिडीओ पाहून तुमचंही मन भरुन येईल
रस्त्यावर अनेक अपघात होतात. कुत्र्यांपासून ते अनेक प्राणी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे बळी ठरतात. मात्र, केरळमधील कोची येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक चालकांच्या समजूतदारपणाचे आणि संयमाचे कौतुक करत आहेत. वास्तविक, येथे बंदर-विमानतळ रस्त्यावर एक मोठा अजगर रस्ता ओलांडताना दिसला. त्याला पाहून काही चालकांनी आपली गाडी तर थांबवलीच, पण अजगराला आरामात रस्ता ओलांडता यावा म्हणून दुसऱ्यांच्या गाड्या देखील थांबवल्या.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : डान्स करता करता स्टेजवरच भांडू लागल्या मुली, जो सोडवायला आला त्याला सुद्धा धू धू धुतलं!
हा व्हिडीओ १ मिनिट ४७ सेकंदाचा आहे. आपण पाहू शकता की विशाल अजगर रस्त्यावर येत आहे. दोन्ही बाजुला ट्रॅफिक थांबलेली दिसून येत आहे. काही प्रवासी तर या अजगराला आरामात रस्ता ओलांडता यावी यासाठी काळजी घेताना दिसून येत आहेत. शेवटी जेव्हा अजगर सुरक्षित पध्दतीने रस्ता ओलांडून जातो त्यानंतर रस्त्यावर पुन्हा गाड्या धावू लागतात. या क्लिपमध्ये सर्वाधिक वाहन थाबंलेले दिसून येत असले तरी बहुतेक लोकांची नजर ‘स्विगी’ चा युनिफॉर्म घातलेल्या एका स्कूटर चालकावर फिरते. हा व्यक्ती काही सेकंद थांबवल्यानंतर जशी संधी मिळतेय तसंच तो या अजगराच्या तोंडाजवळून स्कुटर घेऊन भुर्रकन जातो. अजगराची ही सगळी दहशत कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.
आणखी वाचा : बर्फावर धावणाऱ्या पेंग्विनचा हा VIRAL VIDEO पाहून कुटुंब का महत्त्वाचं आहे हे समजेल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : समोर आवडते पदार्थ ठेवले होते…पण एका चुकीमुळे जे घडलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल
हा व्हिडीओ ट्विटरवर @pendown ने १० जानेवारीला शेअर केला आहे. “काल रात्री कोच सीपोर्ट-एयरपोर्ट रोडवरच्या कक्कनड सिग्नल इथे दिसलेलं हे दृश्य.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २२ हजारांपेक्षा अधिक व्यूज मिळाले असून ६०० पेक्षा जास्त अधिक लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून थक्क होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.