Viral Video: स्वयंपाक ही एक कला आहे असे म्हणतात. यामध्ये आपण जितका वेळ आणि अधिक सराव करू तेवढं जेवण अधिक चांगल आणि चवदार बनते. सोशल मीडियावर तुम्ही अनेकांना फूड डिश किंवा हेल्दी ड्रिंक्स बनवताना पाहिलं असेल. पण, आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत. यामध्ये एक राजस्थानी माणूस मसाला दूध बनवताना एक हटके प्रयोग करत आहे. लोक या कौशल्याची स्तुती करत आहेत.

व्हिडीओ पहा:

(हे ही वाचा: Eknath Shinde: ‘शोधू कुठे, शोधू कुठे…” एकनाथ शिंदेंच्या प्रकरणावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस)

वास्तविक, या राजस्थानी व्यक्तीचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून या व्यक्तीकडे काही अप्रतिम कौशल्य असल्याचे लिहिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक राजस्थानी व्यक्ती धोती-कुर्ता आणि पगडी घातलेला दिसत आहे. अनेक लोक त्याच्या आजूबाजूला उभे आहेत आणि त्याचा पराक्रम पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, हा माणूस दोन तांब्यात दूध घेऊन ते मिक्स करत करत स्वतःही गोल गोल फिरत आहे.

(हे ही वाचा: Loan: शेतीसाठी नाही तर हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकर्‍याने मागितले ६.६ कोटीचे कर्ज)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला इंस्टाग्रामवर १.८ दशलक्षाहून अधिक युजर्सने बघितलं आहे. नेटीझन्स या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘राजस्थानी रॉक्स.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘पुष्कळ कौशल्य आणि टॅलेंट.’ एका यूजरने लिहिले की, ‘जग घुमिया चाय’. यावर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader