राखी सावंत हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. आपल्या अतरंगी अंदाजांमुळेही ती कायम चर्चेत असते. मात्र सध्या तिने असे काही केले आहे ज्यामुळे तिला लोकांनी धारेवर धरलं असून तिच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. राखीने काय केलंय हे जाणून घेऊया.
नुकतंच राखीला मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध आपली कार उभी केली, ज्यमुळे मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅम झाले. इतकंच नाही तर, यादरम्यान ती म्हणते, “जहां हम खड़े होते हैं, वहीं से लाइन शुरू हो जाती है.” यानंतर ती आपल्या कारमध्ये बसून निघून जाते.
ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं
मात्र, राखीचे असे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडलेले नाही. या घटनेवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असून तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली जात होती. राखी सावंतला ‘नौटंकी’ म्हणत आणि मुंबई पोलिसांना टॅग करत अनेक युजर्सनी राखीवर कारवाई व्हायला हवी असे लिहिले आहे. एका युजरने लिहिले की, “या नौटंकी महिलेवर केस करा.”, तर दुसर्याने लिहिले की, “मुंबई पोलिसांना कारवाई करून एक उदाहरण ठेवावे लागेल.”
अंधेरी-लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनने ही क्लिप ट्विटरवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ५५ हजारांहून अधिक वेळ पाहिला गेला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करू असे उत्तर दिले. ओशिवरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप भोसले यांनी सांगितले की, “आम्ही वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाविरुद्ध दंडाची पावती फाडली आहे.” गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी राखी सावंतला दंड ठोठावला आहे.