Viral Video: समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘रानू बंबई की रानू’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्लीच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘रानू बंबई की रानू’या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedanti_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत २१ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय,“खूप क्यूट.” आणखी एकाने लिहिलेय, “सर्वात भारी केलं हिने” आणखी एकाने लिहिलेय, “ही नेहमीच छान डान्स करते.”