सोशल मीडियामुळे रातोरात स्टार बनलेली राणू मंडल नवा व्हिडीओ घेऊन परतली आहे. यावेळी तिने बांगलादेशी सुपरस्टार हिरो आलोमसोबत गाणे गायले आहे. काही दिवसांपूर्वी आलोमने ‘तुमी चारा अमी’ (Tumi Chara Ami) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका रिपोर्टनुसार, बांगलादेशातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेल्या हिरो आलोमने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रानू मंडलसोबत काम करण्याची घोषणा केली होती.
आलोमने युट्युबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ही डायनॅमिक जोडी त्यांचे पहिले गाणे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एकत्र रेकॉर्ड दिसतेय. दोन्ही गायक लाल रंगाचे कपडे परिधान करून एकत्र हे गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि राणू मंडलला पुन्हा एकदा इंटरनेटवर पाहून लोकांना आनंद झाला आहे. अनेकांनी अभिनंदन आणि प्रोत्साहनपर संदेश पोस्ट केले, तर काहींनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल केले आहे.
विमानात अचानक रडू लागली फ्लाइट अटेंडंट; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक
Netflix ला बसला जबरदस्त धक्का! गेल्या ३ महिन्यात गमावले ‘इतके’ ग्राहक; जाणून घ्या कारण
एक युजर म्हणाला, ‘बंगालचे लोक ज्यांची इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, ते आता पूर्ण झाले आहे. हिरो आलोम आणि त्याची टीम अशीच पुढे जा!’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘राणू मंडल हिरो आलोमसोबत खूप छान दिसत आहे. या दोघांनीही एकत्र येऊन अशा अनेक गाण्यांची निर्मिती करत राहावे अशी माझी इच्छा आहे.’
पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्थानकावर ‘एक प्यार का नगमा’ हे सदाबहार गाणे गात असताना राणू मंडलला पहिल्यांदा पाहिले गेले. तिच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. रातोरात व्हायरल झाल्यानंतर तिने हिमेश रेशमियाच्या हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटासाठी काही गाणीही गायली. बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात राहिल्यानंतर, स्टेजवर गाणी विसरणे, चाहत्यांशी गैरवर्तन करणे आणि भारी मेकअपमुळे तिला ट्रोल करण्यात आले.