Viral Video: समाजमाध्यमांवर प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड सतत बदलत असतो. मग ती गाणी असोत किंवा एखादा डान्स. अशा या विविध गोष्टींचे व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. अशा प्रसिद्ध गाणी, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळे गाणे तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर लोकांनी लाखो रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणे खूप चर्चेत आहे. त्यावरील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात. अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की, ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकविलेल्या कविता त्यांच्या लक्षात राहत नाहीत; पण रील्समध्ये मुले गाणी पटापट बोलत असताना दिसतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच एका लहान गोड मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यावर ती आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत ‘पुष्पा २’मधील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये टीव्ही संचावर सुसेकी गाणे लावण्यात आले आहे आणि त्या गाण्यावर एक गोड निरागस लहान मुलगी सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने डोळ्यांवर गॉगल लावला असून, सुसेकी गाण्यातील कपड्यांची स्टाईलही कॉपी केली आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील पाहण्यासारखे होते. त्याशिवाय त्या मुलीसोबत तिच्या कुटुंबातील इतर लोकदेखील डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: अरे व्वा! रस्त्यावर स्टॉल लावून चक्क श्वान विकतोय वडापाव; Viral Video पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_superb_kids या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच मुली खूप गोड असतात.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मुलीच्या आयुष्यात तिचे बाबा रीअल हीरो असतात.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “खूप क्युट.” आणखी एकाने लिहिलेय, “प्रिन्सेस आहे ही.”

दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर लहान मुलांच्या विविध गाण्यांवरील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात एका लहान मुलीने गुलाबी साडी या गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली होती.