Rat And Pigeon Fight Video Viral: साप आणि उंदराच्या लढाईचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. साप आणि उंदीर हे दोघे एकमेकांचे शत्रु आहेत, हे माहितीच असेल. उंदीर म्हणजे अगदी सोपी शिकार. सर्व प्राण्यांना अवघ्या काही क्षणातच उंदीर गिळंकृत करता येतं. पण तुम्ही कधी उंदीर आणि कबुतराची लढाई कधी पाहिलीय का? उंदीर आणि कबुतर आमनेसामने आले तर लढाईत कोण बाजी मारेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कबुतर आणि उंदराच्या लढाईचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. या लढाईत कुणाचा विजय होतो, हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेलच.

छोटासा उंदीर ज्याचा साध्या मांजरासमोरही टिकाव लागत नाही. तो उडणाऱ्या कबुतरासमोर काय टिकणार असंच कुणीही म्हणेल. पण या व्हिडीओतील उंदराला पाहून मात्र सर्वजण थक्क झाले आहेत. एक छोटासा उंदीर उडणाऱ्या कबुतरावरही भारी पडला आहे. व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. या व्हिडीओत पाहू शकता एक छोटाशा उंदीर चक्क कबुतरावर हल्ला करण्याचं धाडस करतो. यादरम्यान कबूतर उंदराच्या तावडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु उंदराच्या डोक्यात ही शिकार फत्ते करायचीच असं ठरलंच होतं जणू…उंदीर या कबुतराला काही सोडायला तयार होत नाही. उंदराने कबुतराला मागून धरले होते, त्यामुळे कबुतराला काही करता आलं नाही. कबुतर अगदी फडफडत उंदराच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो, पण उंदराने आपल्या दातात त्याला इतकं घट्ट पकडलं की कितीही प्रयत्न केले तरी कबुतर काही त्याच्या तावडीतून सुटत नव्हता. उंदीर या कबुतराला गटाराच्या आत घेऊन आपले शिकार पूर्ण करतो.

आणखी वाचा : पत्नीला आधी ओढत नेले आणि नंतर खांबाला बांधून मारहाण केली, पतीच्या क्रूरतेचा VIDEO VIRAL

तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. उंदराने कबुतराला मारण्यापूर्वी हा व्यक्ती तेथे आला आणि त्याने कबुतराचे प्राण वाचवले. उंदरापासून निसटल्यानंतर कबुतर सहजतेने उडून गेला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ न्यूयॉर्कमधला आहे. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी असं वाटू लागतं की उंदीर आता कबुतराला खाऊन टाकणार. कारण उंदराने त्याचा जीव घेण्याचं मनाशी पक्क केलं होतं. पण तेव्हढ्यात एका व्यक्तीने काठीच्या मदतीने दोघांना वेगळे केले. काठी पाहून उंदीर शेपूट दाबून पळून गेला आणि कबुतराचा जीव वाचला.

आणखी वाचा : बाबा रे! मॉलमध्ये मुलीने मुलाला लाथा-बुक्क्या आणि चपलीने धू-धू धुतलं, या मारहाणीचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : विमानात प्रवासी लक्ष देत नव्हते म्हणून या फ्लाईट अटेंडंट्सने असं काही केलं की…; पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ ‘व्हॉट इज न्यू यॉर्क’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कबुतर आणि उंदराचा हा सामना लोकांना खूपच मनोरंजक वाटला. यात कबुतराच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खरंच उंदर एव्हढा खतरनाक असेल यावर विश्वास बसत नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आजपर्यंत मी एका पक्ष्याला उंदराची शिकार करताना पाहिले आहे, पहिल्यांदाच असे घडत आहे की उंदीर पक्ष्याची शिकार करत आहे.’

Story img Loader