Viral Video: ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’, हे वाक्य अनेकदा तुम्ही वाचलं किंवा पाहिलं असेल. खरंच प्रेम ही एक सुंदर भावना आहे, त्यामुळे त्याचे वर्णन शब्दात केले तरीही ते कमी पडेल. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावी, आपली काळजी घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. शिवाय मुलगा असो किंवा मुलगी आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या अशाच एका प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्याही जोडीदाराची आठवण येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सगळीकडे लग्नसराईचे दिवस सुरू असून या दिवसांमध्ये सोशल मीडियावरही लग्नाचे अनेक सुंदर व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत आहेत, ज्यात कधी वधू आणि वराची सुंदर एन्ट्री पाहायला मिळत आहे तर कधी लग्नातील उखाणे, गमतीशीर घटना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्न मंडपामध्ये वधू आणि वर एकमेकांसमोर वरमाला घालण्यासाठी उभे असून यावेळी वधू वराच्या गळ्यात वरमाला घालते, त्यानंतर जेव्हा वर वधूच्या गळ्यात वरमाला घालणार तेव्हा तो भावनिक होऊन रडायला सुरुवात करतो. वरमाला घालताना त्याच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_namu_kamble_31 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर सात मिलियनहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, त्याची बायको खूप नशिबवान आहे, ऐवढं प्रेम करणारा नवरा मिळाला. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्याला मिळवण्यासाठी जो संघर्ष करतो आणि त्याला जेव्हा यश येतं, तेव्हाच डोळ्यातून अश्रू येतात.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बिचाऱ्याला काय माहीत नाय अजून… देवा हिंमत द्या बिचाऱ्याला.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video real love story groom crying on varmala ceremony video viral on social media sap