आजकालची लहान मुलं ही फक्त म्हणायला लहान असतात, त्यांच्या हुशारीपुढे कुणाचीच चालत नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इतकी धमाल आणि मजेदार असतात की कधी प्रश्न पडतो की ते लहान आहेत आपण? आपण विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेली उत्तरे ऐकून कधी कधी हसू आवरत नाही. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी येत राहतात आणि लोकांना खूप हसवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये युट्युबरने विचारलेल्या प्रश्नांवर या चिमुकल्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक YouTuber काही मुलांपर्यंत पोहोचतो. तो एका मुलाला विचारतो, ‘तू मोठा होऊन काय बनशील?’. त्यावर या लहान मुलाने जे उत्तर ते फार मजेदार आहे. यावेळी लहान मुलगा म्हणतो, “आम्ही कधी लिहायला वाचायला शिकलो नाही, मग मोठं होऊन आम्ही काय बनणार, असं आम्ही काय बनवू स्वतःला? मोठे झालो काम करेल..स्वतःचं घर बनवेल. खाणार, पिणार आणि बायको आणणार.”

आणखी वाचा : बाप रे! महाकाय अजगर खांद्यावर घेऊन तो फिरवू लागला, VIRAL VIDEO पाहून तुम्हाला ही बसेल धक्का!

लहान मुलाचं हे उत्तर ऐकून तुम्ही थोडे चक्रावून जाल. पण थोडं थांबा. कारण या मुलगा इथवरंच थांबत नाही. शेवटी त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुम्ही पोट धरून हसाल. सोशल मीडिया युजर्सना त्याचे हे शब्द फार आवडले. बायकोला आणल्यावर तो म्हणतो, ‘”२-३ मूल होईल’.” यावर YouTuber त्याला थांबवतो, हसतो आणि म्हणतो, ‘२-३ मुलं नक्की आणशील?.’ हे ऐकून तो मुलगा थक्क होतो आणि म्हणतो, ‘मग काय, २-३ मुलं नाही केली तर चालेल का? असंच राहू का?.” यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओचा हा भाग तुम्हाला सर्वात जास्त हसवणारा आहे.

आणखी वाचा : बाबो! पैशांसाठी लहान मुलीने खाल्ली हिरवी मिरची? जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घोडा रडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

काही सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. लोक या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ जितक्या वेळा तुम्ही पाहाल तितक्या वेळा तुम्हाला हसायला भाग पडेल, हे नक्की.