सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये, एका रिपोर्टरने बिहारी बॉयची मुलाखत घेतलीय. या व्हिडीओमधल्या बिहारी बॉयला साधा प्रश्न विचारण्यात आला, पण प्रत्येक प्रश्नाचं त्याने इतक्या भन्नाट पद्धतीने उत्तरे दिलेत, हे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “प्रश्न-उत्तर सोडा! आत्मविश्वास असला पाहिजे…’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या ४५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक रिपोर्टर बिहारमधील सहावीच्या विद्यार्थ्याची मुलाखत घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर त्या मुलाला विचारतो, “तुझा आवडता विषय कोणता आहे?” उत्तर देताना तो मुलगा ‘वांगी’ असं म्हणतो. तो अभ्यासाच्या विषयाबद्दल विचारतोय असं सांगून रिपोर्टर त्या मुलाला पुन्हा विचारतो. मग मुलगा आवडता विषय इंग्रजी असं उत्तर देतो. रिपोर्टर नंतर त्या मुलाला विचारतो, “तुला काही इंग्रजी कविता आठवतात का?” तो मुलगा पुन्हा मोठ्या आत्मविश्वासाने चुकीचं उत्तर देतो आणि म्हणतो, “हो…५५…. मी ५५ पासून ते अगदी १०० पर्यंत स्पेल करू शकतो.” रिपोर्टर नंतर त्याची चूक दुरूस्त करतो आणि मुलाचे मित्र त्याच्याकडे हसायला लागतात. तो मुलाला पुन्हा दुरुस्त करून विचारतो आणि त्याला पोयमचा हिंदी अर्थ समजावून सांगतो.

आणखी वाचा : काय सांगता? एकाच वेळी अनेक मुलींना करत होता डेट, एका टिकटॉक युजरच्या VIRAL VIDEO मुळे झाला भांडाफोड

शेवटच्या प्रश्नात पत्रकाराने त्या मुलाला विचारले, “आपल्या देशाचा पंतप्रधान कोण आहे?” मुलगा उत्तर देतो, “नितीश कुमार”, जे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा निराश झालेल्या पत्रकाराने पुन्हा पंतप्रधानांबद्दल विचारले तेव्हा तो लगेच दुसरं चुकीचे उत्तर देतो, “लालू यादव”. त्याचे मित्र त्याला मदत करतात आणि पंतप्रधान मोदी असल्याचे सांगतात. मग तो मुलगा रिपोर्टरला “मोदी” सांगतो. मग रिपोर्टरने त्या मुलाला पंतप्रधानांचे पूर्ण नाव विचारले, तेव्हा तो मुलगा उत्तर देताना म्हणतो, “मोदी सरकार!”

आणखी वाचा : ‘हा’ माणूस एकाच वेळी ५० ऑम्लेट खातो, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मित्राचा जीव वाचवण्यासाठी रेड्याने सिंहीणीला शिंगाने उचलून फेकले, VIRAL VIDEO पाहून म्हणाल वाह, ही खरी मैत्री!

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६.८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की अनेकांना हा व्हिडीओ पाहून तो रिट्वीट करण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.

Story img Loader