करोना महामारीपासून लोकांसाठी बेकिंग पदार्थ बनवणे हे सगळ्यात आवडतं काम बनलं आहे. लोक त्यांच्या घरी आरामात सर्व प्रकारचे स्वादिष्ट भाजलेले खमंग पदार्थ बनवत आहेत. आपल्याला फक्त बेकिंगसाठी योग्य माप आणि रेसिपी माहित असणे आवश्यक आहे. बेकिंग पदार्थ बनवताना गोड आणि चिकट पदार्थ मिसळले जातात, त्यामुळे पदार्थाचा गोडवा वाढतो आणि स्वादिष्ट अन्न मिळतं. पण हे चिटक पदार्थ योग्य मापात टाकण्यासाठी तितकीच डोकेफोडी असते. मध, पाक, तेल किंवा सिरप सारखे पदार्थ मापात घेण्यासाठी वापरलेली भांडी चिकट होऊन खराब होतात, मग ती भांडी घासण्यात अर्धी मेहनत घ्यावी लागते. बेकिंगचे पदार्थ तयार करताना हा त्रास होतो म्हणूनच लोक घरच्या घरी बेकिंगचे पदार्थ करण्यासाठी कंटाळतात. पण आता काळजी करू नका. कारण एका व्हायरल हॅकने यावर तोडगा मिळवून दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा हॅक इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल हॅक मूळतः फूड ब्लॉगर हॉली लिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हे @healing_with_holly22 या हँडलने शेअर केले होते. @todayyearsold नावाच्या एका लोकप्रिय इन्स्टाग्राम पेजवर हा व्हायरल हॅक पुन्हा पोस्ट करण्यात आला. हा हॅक बघता बघता इतका व्हायरल झाला की त्याला आतापर्यंत ६.९ मिलियनपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यूज आणि ४ लाख २२ हजार लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : इतक्या मोठ्या गेंड्याला उचलून बिबट्या झाडावर चढला, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक साधा पण हटके हॅक दिसेल. या हॅकच्या मदतीने बेकिंग पदार्थ करणे सोपे होईल. हा व्हिडीओ स्पष्ट करतो की जर तुम्हाला मध, सिरप, तेल यांसारखे चिकट पदार्थ मोजायचे असतील तर तुमच्या चमच्याचा मागचा भाग मैदा किंवा पिठात दाबा. त्याने एक खड्डा किंवा जागा तयार करा. तुम्हाला ज्या आकारात चिकट पदार्थ मोजायचे आहेत त्या आकाराचे भांडे अशाच पद्धतीने पीठात मागच्या भागाने खड्डा बनवा. या जागेत जो चिकट पदार्थ मोजायचा आहे तो टाका. तुमच्या भांड्यांना खराब न करता कोणतीही गडबड न होता तुम्ही बेकिंग करण्यासाठीचे चिकट पदार्थांचे मोजमाप करू शकता.

आणखी वाचा : भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता अन् अचानक…VIDEO VIRAL पाहून अंगावर येईल काटा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Video : उंटासोबत सेल्फी पडला महागात! घडलं असं काही की महिलेला थेट जमिनीवर आपटलं

लोकांना हा हॅक खूप सोपा आणि सोयीचा वाटला. या व्हायरल हॅकबद्दल हजारो युजर्सनी त्यांचे मत व्यक्त केले. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. एका शेफने कमेंट करत लिहिलं की. मी गेली २० वर्षे शेफ म्हणून काम करतोय, पण आतापर्यंत मला ही कल्पना कधी सुचली नाही.” इतर काहींनीही हॅकबाबत शंका उपस्थित केल्या. पण लोकांना हा हॅक आवडला आणि तो वापरण्याचा प्रयत्नही करत आहेत.