Pune’s Wild Rickshaw Ride Caught on Camera : पुणे तिथे काय उणे ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल पण त्याचा अर्थ माहितीये का? अशी कुठलीही गोष्ट शोधून सापडणार नाही जी पुण्यात सापडणार नाही. पुणेरी पाट्यात जगप्रसिद्ध आहेतच पण तुम्हाला पुण्यात एकापेक्षा एक ठिकाणे पाहायला मिळतील, एका पेक्षा एक प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटतील आणि त्यांचे अफलातून किस्से देखील ऐकायला मिळतील. पुण्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

पुण्यातील रिक्षाचालकांची हद्दचं झाली रावं!

पुण्यात जसे पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेत तसेच पुण्यातील रिक्षाचालकही देखील प्रसिद्ध आहेत. प्रवाशांना सरळ सरळ तोंडांवर रिक्षा नाकारणे, १ ते ४ वेळेत झोपा काढणे असे किस्से तुम्ही ऐकले असतील पण सध्या पुण्यात घडलेला हा रिक्षाचालकांचा किस्सा कधीही कोणी ऐकला नसेल. पुण्यातील एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते जे काही केले आहे ते पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे.

हेही वाचा – जंगलात हरवलेलं मांजर १२८८ किलोमीटर प्रवास करून परतलं घरी! वाचा, नक्की काय घडलं?

रिक्षाबरोबर बॅरिकेडही नेलं ओढून

व्हायरल व्हिडिओ पुण्यातील नवले पुल परिसरातील सर्व्हिस रस्त्यावरील आहे. एका रिक्षा पुलाजवळील रस्त्यावरून धावत आहे पण धक्कादायक गोष्ट अशी की रिक्षाचालकाने रिक्षाबरोबर रस्त्यावरील बॅरिकेडही ओढून नेल आहे. एखादे बॅरिकेड नव्हे तर चार-पाच बॅरिकेड एकाचवेळी रिक्षाबरोबर ओढले जात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्यावरून जाणारे इतर वाहनचालकही रिक्षाचालकाकडे वळून वळून आश्चर्याने बघत आहेत. काही लोक तर गाड्या थांबवून समोर घडतं असलेला प्रकार पाहून डोक्यावर हात मारून हसताना दिसत आहेत. नक्की असे काय घडले की रिक्षाचालकाला रिक्षाबरोबर बॅरेकेड ओढावे लागले हे मात्र या व्हिडीओमध्ये दाखवलेले नाही. तरीही हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा – १९९१ मधील पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक कशी होती माहितीये का? पाहा Viral Video

नेटकऱ्यांना आवरेलाना हसू

व्हिडिओ इंस्टाग्रामवर _punethings नावाच्या पेजवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नवले ब्रिज सर्विस रोडवर रिक्षावाल्याने चक्क बॅरिकेड ओढून नेले. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरले नाही. अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली. एकाने उपाहासात्मक टोला मारत कमेंट केली की,” “पुणे मुंबई पॅसेंजर लोकल येत आहे”

तुम्हाला पुणेरी रिक्षाचालकाचा व्हिडिओ पाहून काय वाटले?