सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यात तुम्हाला देसी जुगाड बघायला मिळतो. देसी जुगाड भारतात सर्वाधिक वापरले जाते. परदेशात याला लाईफ हॅक ट्रिक म्हणतात. भारतामध्ये जुगाडला खूप मागणी आहे, कारण यामुळे अत्यंत अवघड कामेही लवकर पूर्ण होतात. अनेकदा काही लोक असा जुगाड करतात की त्याच्याकडे इनोवेशन म्हणून बघितलं जातं. असाच एका रिक्षा चालकाच्या देसी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अप्रतिम जुगाड

मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रिक्षा चालकाने आपल्या वाहनात ग्राहकांना आरामदायी वाटण्याचे अप्रतिम काम केले आहे. त्याने चारचाकी वाहनात असेली बॅकसीट बसवली आहे. जो कोणी ग्राहक या रिक्षेत बसतो तो, रिक्षा ड्रायव्हरची स्तुती करतो. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

रिक्षेत चारचाकीचा फील

एक महिला या जुगाडू रिक्षेमध्ये फिरली आणि तिला रिक्षा खूप आवडली. म्हणूनच तिने त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. या रिक्षाचालकाचा जुगाड पाहून लोकांनी त्याचे कौतुक केले. गाडीत बसलेल्या महिलेने तिचा अनुभव सांगितला.

(हे ही वाचा: Photos: पार्ले-जी मधील ‘जी’ चा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?)

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

१२ सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हाला चारचाकी गाडीत बसल्याचा भास करून देईल. वालिया बेबीकॅट्स नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा ऑटो ड्रायव्हर ३००० वर्षातमध्ये राहत आहे.’ आतापर्यंत हा व्हिडीओ २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video rickshaw or car take a look at the drivers desi jugaad ttg