Rishi Sunak Viral Video: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यावर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनीही व्हाईट हाऊसमधील दिवाळीच्या सेलिब्रेशन दरम्यान सूनक यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. पण यावेळी केलेल्या एका चुकीने जो बायडन आता सर्व भारतीयांकडून ऑनलाईन ट्रोल होत आहेत. यापूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीची आठवण करून देत अनेकांनी ट्रम्प व बायडन यांची तुलनाही केली आहे. आधी ट्रम्प व आता बायडन यांच्या चुकांमुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भारतीयांचे नाव योग्य उच्चारण्यात नक्की काय समस्या येते असा मजेशीर प्रश्न नेटकरी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर झालं असं की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन दिवाळीच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात ऋषी सूनक यांचे कौतुक करत शुभेच्छा देत होते. पण ज्यावेळी सूनक यांचे नाव घेण्याची वेळ आली तेव्हा बायडन नेमके गोंधळले. ‘ऋषी सुनक’ म्हणण्याच्या ऐवजी बायडन यांनी ‘रशीद सनुक’ असे नाव घेतले. बायडन पुढे म्हणाले की, पुराणमतवादी पक्षाचे पंतप्रधान ऋषी सुनक ब्रिटनच्या राजाला भेटायला जाणार आहेत हे सुद्धा कौतुकास्पद आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हणताना बायडन यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा सुनक यांचे नाव रशीद सनुक असे घेतले.

जो बायडन का होत आहेत ट्रोल?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, ट्विटरवर अनेकांनी बायडन यांची ही चूक नेमकी पडकून त्यांना ट्रोल करायला सुरु झाले आहेत. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतभेटीत स्वामी विवेकानंद व सचिन तेंडुलकर यांचे नाव चुकीचे घेतले होते. आता ट्रम्प यांच्या पाठोपाठ नव्याने राष्ट्राध्यक्ष झालेले जो बायडन यांनीही भारतीय वंशाच्या सूनक यांचे नाव चुकीचे उच्चारून नेटकऱ्यांना दोघांची तुलना करण्याची आयती संधी दिली असे म्हणता येईल.

सुनक यांनी मंगळवारी सकाळी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video rishi sunak name mispronounced by joe biden as rashid sanook netizens compare with donald trump svs