माणसाची वेळ चांगली असेल तर कोणतंही संकट त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. तुम्ही लोकांना असं बोलताना अनेकदा ऐकलं असेल. पण सध्या सोशल मीडियावर या संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला ही म्हण खरी असल्याचं जाणवेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण कसा वाचला आहे, हे तुम्ही पाहू शकता. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला हेच म्हणावेसे वाटेल की कदाचित आज यमराजाला हार मानावी लागली. पण अपघातातून एखाद्याचा इतक्या चमत्कारिक पद्धतीने जीव वाचेल याचा कुणी कधी स्वप्नातही विचार करणार नाही. एका तरुणावर गाडीच्या रुपात मृत्यू आला तर दुसऱ्या गाडीने त्याच मृत्यूला पिटाळून लावलं आहे. हे दृश्य पाहून तुमचं हृदय हेलावून जाईल.
चमत्कारिक पद्धतीनं बचावला तरुण
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण रस्त्याच्या कडेल एक बाईकवर बसला आहे. तो कुणाची तरी वाट पाहतो आहे, असं दिसतं. दरम्यान अचानक या तरुणाच्या उजव्या बाजूने जेसीबी अंगावर येते. तरुणावर कोसळणार, त्याला उडवणार त्याच क्षणी डाव्या बाजुने एक बोलेरो येते आणि ती थेट या जेसीबाला धडकते. तरुणही घाबरुन बाईक तिथंच सोडून बाजूला होता. यामुळे या तरुणाचा जीव वाचतो. एका तरुणाला गाडीपासून वाचवण्यासाठी दुसरी गाडी आली. अपघाताचा असा व्हिडीओ तुम्ही आजवर कधीच पाहिला नसेल. खरंतर हा अपघात कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीच. खरोखर या तरुणच्या मदतीसाठी देवच धावून आला असं तुम्ही म्हणालं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: चालत्या बाईकवर तरुणींचा किसिंग स्टंट, एकमेकींना मिठी मारत थरारक स्टंट, अन् घडलं…
जेसीबी यमराजाच्या रूपाने त्याच्याकडे धावून आला तोच बोलेरोच्या रुपात देव धावून आला अशा प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडीओवर देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही हा चमत्कार पाहून शॉक झाले असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.