Viral Video: सोशल मीडियाप्रमाणेच आता रस्त्यावर, ट्रेनमध्ये कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. अनेक जण प्रसिद्धीसाठी हल्ली कुठेही रील्स बनविताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक रशियन तरुणी लग्नासाठी मुलगा हवा असल्याची जाहिरात करताना दिसत आहे.
आयुष्यात लग्न करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. हल्ली अनेक जण स्वतः निवडलेल्या जोडीदारासोबत लग्न करतात. पण असेदेखील काही लोक असतात; जे घरच्यांच्या इच्छेनुसार किंवा मॅट्रिमोनी अॅप्सच्या मदतीनं लग्न करणं पसंत करतात. पण आता व्हायरल होणारी तरुणी चक्क हातात एक पोस्टर घेऊन लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचं दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओ भारतातील एका मॉलमधील असून, येथे एक रशियन तरुणी लाल रंगाची साडी नेसून, हातात एक पोस्टर घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या तरुणीच्या हातामध्ये “लग्नासाठी अविवाहित भारतीय तरुण शोधत आहे”, असं तिनं लिहिलेलं आहे. त्याशिवाय या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये तरुणीनं “मला मदत करा त्याला शोधायला”, असं तिनं लिहिलं आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dijidol या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक जण लाइक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर सहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ७० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरनं कमेंट करून लिहिलंय, “माफ करा, माझे लग्न काही दिवसांपूर्वीच झालं; पण तुम्हाला योग्य जोडीदार मिळो.” दुसऱ्या एकानं लिहिलंय, “माझे काका अविवाहित आहेत. त्यांचं वय ७५ आहे आणि ते करतील लग्न.” तर आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “इन्स्टाग्रामला मॅट्रिमोनी साइट बनवली.” तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “तुमची जन्मतारीख आणि जन्माची वेळ सांगा.”