Viral Video: आजवर अनेकदा आपण राजकारण्यांना स्वतःचे दोष इतरांवर ढकलताना पाहिले असेल. सत्तेत असतानाही इतरांना निशाणा करून आपली योग्यता सिद्ध करणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. मात्र बिहारमध्ये एका अर्थाने उलटी गंगा वाहताना दिसत आहे. बिहारच्या आरजेडी पक्षाचे नेते यांनी आपल्याच अधिकाऱ्यांना चोर म्हंटले आहे इतकंच नाही तर स्वतःलाही त्यांनी चोरांचा पुढारी म्हंटले आहे. कृषी मंत्री सुधाकर सिंह यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: असं काय झालं की ब्रिटनचे राजे चार्ल्स चार दिवसातच वैतागले, म्हणतात “मला हे सगळं सहन…

काय म्हणाले कृषी मंत्री?

आरजेडी नेते आणि बिहारचे कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना चोर आणि स्वतःला “चोरो का सरदार” संबोधले होते. कैमूरमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना “आमच्या (कृषी) विभागाची एकही शाखा नाही जिथे चोऱ्या होत नाही. मी विभागाचा प्रभारी असल्यामुळे मी त्यांचा सरदार (मुख्य) झालो आहे…माझ्यापेक्षाही बरेच लोक आहेत, असे सिंग म्हणाले होते.

मला वाटत नाही की कोणत्याही शेतकऱ्याला महामंडळाने दिलेले बियाणे त्याच्या शेतात वापरता येत असतील आणि अशा प्रकारे बियाणे महामंडळ १५० ते २०० कोटी रुपये मधल्या मध्ये चोरत आहे.

Jio Recharge Plans: जिओचा टॉप रिचार्ज प्लॅन पाहून नेटकरी झाले लोटपोट, म्हणाले “एवढे पैसे वाचवून आम्ही…

इतकेच नव्हे तर पुढे कृषिमंत्र्यांनी जनतेला त्यांचे पुतळे जाळण्यास सांगितले. सिंग म्हणाले की, “माझे पुतळे जाळत राहा, मग मला कळेल की शेतकरी माझ्यावर रागावला आहे. अन्यथा, मला सर्व काही ठीक आहे असे वाटेल.

पाहा कृषी मंत्र्यांचे मोठे विधान

दरम्यान, “चोरो का सरदार” या टिप्पणीबद्दल विचारण्यात आल्यानंतर, सुधाकर सिंग यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. “मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. मी माझ्या विधानात बदल करणार नाही.लोकांनी मला निवडून दिले आहे आणि त्यांच्यासाठी मी लढत राहीन,” असे पुढे सिंग यांनी म्हंटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video sab chor hai and i am their leader says rjd leader bihar agricultural minister sudhakar singh svs