सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. क्षणात आनंदी तर क्षणात भावुक करणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका टीव्हीच्या दुकानाबाहेर दोन गरीब मुलं टीव्ही पाहण्यासाठी थांबलेली दिसत आहेत. तेथील दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्याने केलेल्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन गरीब मुली टीव्हीच्या दुकानाबाहेर टीव्ही पाहण्यासाठी जमिनीवर बसल्याचे दिसत आहे. त्या दुकानदाराला हे लक्षात येताच तो बाहेर येउन या मुलींना त्यांना टीव्हीवर काय पाहायचे आहे हे विचारतो, यावर मुली जे सांगतात त्यानुसार तो चॅनल बदलताना दिसत आहे. दुकानदाराच्या या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: वाघाचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करताना घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

गौतम त्रिवेदी या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दुकानादाराने या गरीब मुलींची इच्छा पुर्ण केल्याने, नेटकरी या दुकानदाराचे कौतुक करत आहेत. प्रत्येकाने सुखसुविधा उपलब्ध नसणाऱ्या व्यक्तींसाठी जितकी शक्य असेल तितकी मदत करण्याची प्रेरणा या व्हिडीओतून देण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video salesmans kind gesture towards poor kids who wants to watch tv from outside the showroom wins internet pns