Teacher Student Viral Video: सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका आणि विद्यार्थीनी वर्गात एकत्र नाचताना दिसत आहेत. शिक्षिका मनू गुलाटी यांनी स्वतः ट्विटरवर व्हिडीओ अपलोड केला होता. तिने दिवसाच्या शेवटी ती तिच्या विद्यार्थ्यांसोबत कशी मजा करते हे दाखवले.
शिक्षिकेने हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, ‘विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायला आवडते. त्याला आपली भूमिका बदलायला आवडते. मॅडम तुम्ही पण करा, मी शिकवेन. इंग्रजीचा वर्ग संपल्यानंतर हरियाणवी गाण्यांवर नृत्य केला. आमच्या शाळेचा दिवस संपल्यानंतरची एक झलक.’ या ट्विटसोबत त्यांनी #MyStudentsMyPride #DelhiGovtSchool हे दोन हॅशटॅग देखील वापरले.
आणखी वाचा : फुल विकणाऱ्या एका काश्मिरी व्यक्तीने म्हटला ‘Pushpa’ चा फेमस डायलॉग, लोक म्हणाले, “यात फायर जास्त आहे!”
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल
या व्हिडीओमध्ये इंग्रजी शिक्षिका तिच्या एका विद्यार्थींनींसोबत वर्गात हरियाणवी गाण्यावर नाचताना दिसत आहे, तर इतर विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करत तिला जल्लोष करत आहेत. विद्यार्थिनी ठुमका स्टेप करत असताना तिने तिच्या इंग्रजी शिक्षिकेला तिच्यासोबत नाचण्याची विनंती केली.
ती शिक्षिकेला डान्स करण्यासाठी मदत करेल, असं विद्यार्थिनींनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर शिक्षिका त्याच ठुमका स्टेपची कॉपी करू लागतात आणि विद्यार्थीनीसोबत नाचतात. त्या त्यांचा डान्स परफॉर्मन्स पूर्ण करत असताना वर्गातील इतर मुली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. व्हिडीओला ५९ हजार व्ह्यूज आणि २८०० लाईक्स मिळाले आहेत.