Viral Video: सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील विविध व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. या व्हिडीओत कधी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकविताना दिसतात, तर कधी काही विद्यार्थी डान्स, अभिनय किंवा इतर कला सादर करताना दिसतात. पण, कधी कधी शाळेतील असे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, जे पाहून व्हिडीओतील व्यक्तीची अक्षरशः कीव येते. आता समोर आलेल्या व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.
शाळेला विद्येचे मंदिर म्हटले जाते, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आयुष्यभरासाठी खूप मोठी देण असते. पण, कधी कधी याच शाळेमध्ये काही विद्यार्थी असे असतात, जे वाईट संगतीमुळे किंवा वाईट संस्कारांमुळे चुकीच्या गोष्टी करण्याचं मोठं पाऊल उचलतात. आई-वडील मोठ्या कौतुकाने मुलांना शाळेत पाठवतात. पण, मुलं त्यांच्या स्वप्नांवर पाणी सोडतात. आजपर्यंत अशा अनेक घटना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यामातून व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आताही अशीच एक घटना समोर आली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेमागच्या आवारात दोन विद्यार्थिनी चक्क सिगारेट ओढताना दिसत आहेत. सुरुवातीला या व्हिडीओत एक जण सिगारेट ओढताना दिसते, त्यानंतर आणखी एक जण तिथे येते आणि सिगारेट ओढायला सुरुवात करते. यावेळी त्यांच्या वर्गातील मुलं-मुली त्यांच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ भारतातील नसून परदेशातील आहे.
हा व्हिडीओ इन्स्टग्रावरील @pagenaykhonghetrend या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स आल्या आहेत. अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एकाने लिहिलंय की, “यांना चांगलाच चोप दिला पाहिजे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “यांचे पालक कुठे आहेत?”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “मूर्खपणा आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “समाज बिघडत चाललाय.”