Viral Video: संस्कार म्हणजे शिस्त, थोरमोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी, परोपकारी. असं म्हणतात, मुलांना चांगले संस्कार देणे हे आईवडीलांच्या हातात असते. चांगले संस्कार मिळालेले मुले आयुष्यात पुढे चांगली व्यक्ती होतात. त्यांना लोक त्यांच्या माणुसकीमुळे ओळखतात. ते इतरांना मदत करायला नेहमी धावतात. इतरांबरोबर प्रेमाने व आदराने वागतात. सोशल मीडियावर माणुसकी व संस्कार दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मिडीयावर अनेकजण व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात अनेक व्हिडीओतून आपल्यालाही शिकायला मिळत असते. हा व्हिडीओ म्हणजे संस्कार का महत्त्वाचे असतात त्याचे उत्तम उदाहरण आहे.

ट्रेनमधील प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रील्सचे, कधी भांडणाचे, तर बसण्यासाठी केलेल्या जुगाडचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. याशिवाय ट्रेनमधील अपघाताचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे.

Shocking Mother's Phone Addiction Viral Video mother accidentally drops little child in dustbin while talking on phone video
अरे चाललंय काय? फोनवर बोलायच्या नादात आईनं कचऱ्याऐवजी चक्क बाळाला फेकलं; VIDEO पाहून धक्का बसेल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Emotional Viral Video in school
Video : शिक्षिकेने आईवडिलांविषयी विचारलं अन् चिमुकली ढसा ढसा रडायला लागली; Video होतोय व्हायरल
success story police son surprised mother with police result emotional video goes viral
“आई तुझा लेक पोलीस झाला गं” तरुणानं कित्येक पिढ्यांचं दुःख दूर केलं; माय-लेकाचा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Parent Came Up With A Unique Jugaad To Find Their Missing Kids At The Maha Kumbh Mela Video
VIDEO: कुभंमेळ्यात लहान मुलं हरवू नये म्हणून पालकांनी केला भन्नाट जुगाड; कपड्यांवर लावलं असं पोस्टर की वाचून पोट धरुन हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये. याच गर्दीत एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन उभी असलेली दिसत आहे. यावेळी या महिलेला जागा देणं अपेक्षित आहे मात्र कुणीही जागेवरून उठून सीट देत नाहीये. यावेळी एका तरुणाचं या महिलेकडे लक्ष जातं आणि हा तरुण क्षणाच उठून महिलेला बसायला त्याची सीट देतो. ती महिलाही सीटवर बाळाला घेऊन व्यवस्थित बसताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “माणूस नुसता शिकून मोठा होत नाही तर त्याला संस्काराचीही जोड असावी लागते” यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “धन्य तुझे आई वडील” तर आणखी एकानं संस्कार खूप महत्त्वाचे असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader