Viral Video: सोशल मीडियामुळे गावापासून परदेशापर्यंतचे अनेक नवनवीन व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओंमुळे आपल्याला त्या ठिकाणच्या अनेक गोष्टींची माहिती मिळते. हल्ली गावकरी मंडळीदेखील खूप अॅडव्हॉन्स झाली आहेत. शेतातील, गावातील विविध व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शेअर करत असतात, ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणच्या अनेक गोष्टी, प्रथा, परंपरा कळतात. सध्या असाच एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून काहीक्षण तुमचाही थरकाप उडेल.
महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये बैलगाडा शर्यत स्पर्धा अनेकदा मोठ्या उत्साहात पार पडतात. या रांगड्या खेळातील स्पर्धेचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना आपण पाहतो. अनेकदा हे थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओदेखील असाच आहे, जो पाहिल्यावर तुम्हीदेखील काहीक्षण अवाक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावातील मैदानावर बैलगाडा शर्यत सुरू आहे. ही शर्यत पाहण्यासाठी बरीच मंडळी उपस्थित असून यावेळी अचानक वेगाने एक बैलगाडा तिथे येतो. बैलगाडा येताना पाहून रस्त्यात उभे असलेले लोक वाट दिसेल तिकडे पळत सुटतात. पुढे त्या बैलगाड्याचे दोन्ही बैल एवढ्या जोरात धावतात की, काही सेकंद बैलगाड्याचा मालकदेखील गाडीसोबत हवेत उडून जोरात जमिनीवर आदळतो. या वेळी ते दोन्ही बैल प्रचंड वेगाने पळत होते. पण, मालकाने यावेळी बैलांवरची पकड अजिबात सोडली नाही.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shetivadi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर बैल जोमात मालक कोमात असंदेखील लिहिण्यात आलं आहे; तर अनेक जण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यातील एका युजरने लिहिलंय की, खूप दम लागतो भाऊ याच्यावर बसायला; तर दुसऱ्याने लिहिलंय की, बैलगाडा नाही तर हवाई गाडा आहे. तर आणखी एकाने लिहिलंय की, कंबर गेली असेल याची. तर आणखी एकाने लिहिलंय की, स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या.
हेही वाचा: बापरे! बोगद्यात सापडला मानवी सांगाड्यांचा ढिग; Viral Video पाहून उडेल थरकाप
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून एकवीस हजारांहून अधिक लोकांनी यावर लाइक केले आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. याआधीदेखील एका वरातीतला व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक वर आपल्या लग्नात जाताना बैलगाड्यावरून जाताना दिसला होता.