Viral Video: असं म्हणतात की, आपण करीत असलेली प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट कर्माच्या माध्यामातून पुन्हा आपल्या आयुष्यात येते. हे फक्त मनुष्यांबरोबरच नाही, तर प्राणी, पक्षी अशा सर्वांच्या बाबतीत घडतं. हल्ली या संदर्भतील अनेक गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एका गेंड्याने विनाकारण ट्रकला धडक देण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यानंतर तो स्वतःच जखमी झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर आता आणखी एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. त्यात एका चित्त्याबरोबर असं काहीतरी घडलं, जे पाहून नेटकरी हळहळ व्यक्त न करता, ते त्याच्या कर्माचे फळ असल्याचे म्हणताना दिसत आहेत.
जंगलातील हिंस्र प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्यांप्रमाणे चित्तादेखील खूप वेगवान प्राणी आहे. चित्त्याच्या अधिक वेगामुळे त्याच्या हातातून सहसा कोणतीही शिकार सुटत नाही. विविध प्राण्यांवर तो क्रूरपणे हल्ला करून, त्यांची शिकार करतो. शिकार करून जरी तो स्वतःची भूक भागवीत असला तरीही त्याच्यामुळे अनेक प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागतात. पण, आता हीच गोष्ट त्याच्याबरोबर होताना दिसतेय. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेकांची शिकार करणाऱ्या चित्त्याची शिकार मगर करताना दिसत आहे.
मगरीकडून चित्त्याची शिकार
हा व्हिडीओ एका जंगलातील तळ्याकाठचा आहे. तेथे तहानलेला चित्ता पाणी पिण्यासाठी जातो. तेथे चित्ता पटापट पाणी पीत असतो. कारण- कदाचित त्याला आतून आपल्यावर कोणीतरी हल्ला करणार असल्याची चाहूल लागली असावी. इतक्यात पाण्यातून मगर बाहेर येते आणि सरळ चित्त्याच्या तोंडावर हल्ला करून, त्याला पाण्यात खेचून घेते. हा थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल.
हा व्हिडीओ इन्टाग्राम वरील @twizzy_nature या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये, “ही मगर चित्ता पकडते; पण मला माहीत आहे की, चित्तासुद्धा मगरीची शिकार करू शकतो,” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कर्माचे फळ आहे. त्यानेही आतापर्यंत अनेकांची शिकार केली असेल.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच भयानक सीन.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून माझ्या अंगावर काटा आला.”