Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना आपण पाहतो. अनेकदा यात कधी वाघ, सिंह यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे विविध व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण आश्चर्यचकित व्हाल.
सिंहाला जंगलाचा राजा, म्हटले जाते. त्यामुळे जंगलातील अनेक प्राणी सिंहाला घाबरतात, सिंहाला पाहताच दूर पळून जातात. पण, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क एक मुंगूस सिंहाशी पंगा घेताना दिसत आहे; जे पाहून तुम्हीदेखील काही क्षण चकित व्हाल. त्यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका गवताळ प्रदेशात एक मुंगूस सुरुवातीला एका सिंहाच्या मागे जाऊन मोठ्याने ओरडते. मुंगुसाचा आवाज ऐकून सिंह दचकतो आणि त्याच्याकडे बघू लागतो. त्यानंतर मुंगूस सिंहासमोर उभे राहून, त्याच्यावर आवाज चढविताना दिसत आहे. सिंहावर सुरू असलेली दादागिरी पाहून दूरवर असलेला एक सिंह धावत मुंगुसाकडे येऊन, त्याच्याकडे रागाने पाहतो. यावेळी आधीपासून उभा असलेला सिंह मुंगुसाकडे येणाऱ्या त्या सिंहाला थांबविण्याचा प्रयत्न करतो. तरीही मुंगूस मोठमोठ्याने ओरडून सिंहाला खुन्नस देते. त्यानंतर काही वेळ सिंहदेखील मुंगुसाकडे रागाने पाहतो. बराच वेळ हा प्रकार सुरू असतो. त्यानंतर मुंगूस उपस्थित सिंहांना दूर पळवून लावताना दिसत आहे.
हेही वाचा: ही आई की कसाई? मुलाच्या अंगावर बसून अमानुष मारहाण; Viral Video पाहून नेटकरीही संतप्त
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ X वरील @Crazy Clips या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. यात एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “तू नड भावा.” आणखी एकाने लिहिलेय, “मुंगूस खूप गंभीर चावा घेतो. कदाचित सिंहांना हे माहीत आहे. त्यामुळेच तो शांत आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “मुंगूस मुख्य भूमिका साकारतोय.” आणखी एकाने लिहिलेय, “आत्मविश्वास असावा तर असा.” तर आणखी एकाने लिहिलेय, “आता हाच खरा जंगलातला हीरो.”