Viral Video: समाजमाध्यमांवर जगभरातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहत असतो. त्यात प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा जंगलातील व्हिडीओंमध्ये सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी हरीण, कुत्रा यांसारख्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. अनेकदा काही प्राणी मानवी वस्तीत येऊन माणसांवरही हल्ला करतात. असे थरकाप उडविणारे व्हिडीओही समाजमाध्यमांवर क्षणात व्हायरल होतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय; ज्यात एक सिंह लहान मुलाला पाहून चवताळल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यात वाघ, बिबट्या यांसारख्या प्राण्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याचे दिसून आले होते. अनेकदा खेड्यासारख्या ठिकाणी वाघ, बिबट्यांची दहशत माजलेली असते; ज्यात असे हल्ले ते करताना दिसतात. नुकत्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येही एक सिंह लहान मुलाला पाहून, त्यावर हल्ला करतो. पण, पुढे व्हिडीओत असं काही होतं; ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wilda_nimalearth या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान गोंडस मुलगा सिंहाला पाहण्यासाठी उभा असतो. त्याच वेळी समोरच्या गुहेतून सिंह त्या लहान मुलाकडे बघत खाली उतरतो. काही वेळ सिंह तिथेच मुद्दाम शांतपणे बसल्यासारखे दाखवतो. काही वेळाने तो मुलगा सिंहाकडे पाठ करून थांबतो आणि त्या संधीचा फायदा घेत, अचानक सिंह मुलाच्या दिशेने धाव घेत, त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न करतो. पण, सिंह आणि तो मुलगा यांच्यामध्ये एक जाड काचेची भिंत असल्याने सिंह त्या काचेवर जाऊन आपटतो. यावेळी सिंहाचा अपेक्षाभंग होतो. दोघांमध्ये काचेची भिंत असल्याचे सिंहाला कळत नाही. पण, सिंहाची झडप पाहून तो मुलगाही काही क्षण घाबरतो. हा व्हिडीओ एका अॅनिमल पार्कमधील असून, तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १७ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे! खरंच प्राणी खूप निर्दयी असतात.” आणखी एकाने लिहिलेय, “शेवटी सिंह तो सिंहच. तो लहान मुलालापण खाणार.” आणखी एकाने लिहिलेय, “सिंहाचा खूप मोठा पोपट झाला.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “या व्हिडीओमुळे सिंह कशा प्रकारे अटॅक करतो ते कळलं.”
दरम्यान, जरी हा व्हिडीओ गमतीशीर असला तरी आधी अशा प्रकारचे अनेक हल्ले सिंह, वाघ यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनी लहान मुलांवर केले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी एका मुलावर वाघाने हल्ला केला होता; ज्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याशिवाय एका खेड्यामध्येही एका बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता.