सोशल मीडियावरील व्हिडिओ कायमच लक्ष वेधून घेत असतात. त्यात लहान मुलांचा निरागसपणा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलांची काळजी घेताना आई कायमचं स्वत:कडे लक्ष देणं विसरून जाते. त्यामुळे आपली आई अशीच दिसते, अशी सवय लहान मुलांना लागून जाते. असं असलं तरी आई मुलांसाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री असते. एका आईचा मेकओव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर आईने जशी घरी एन्ट्री केली, तसं मुलाने तिला पाहताच आश्चर्य व्यक्त केलं. त्याचा रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनी केंट नावाच्या महिलेनं इन्स्टाग्रामवर Britwkent नावाच्या पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत पार्लरमधून केस कापून आल्यानंतर घरी येते. आपल्या पतीला हेअरकट दाखवण्यासाठी बोलवत असते. मात्र तिथे तिची पहिली भेट मुलाशी होते. आईचं बदलेलं रुप पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तिचं रुप पाहून आनंद व्यक्त करतो. पतीनं तिच्या नव्या लूकची स्तुती केली, मात्र मुलाच्या रिअॅक्शननं सर्वांनी मनं जिंकली आहेत. इतका छोटा मुलगा आपल्या बघून म्हणून म्हणाला की, तू खरंच सुंदर दिसते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्याला पसंती दिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजर्सने लिहीलं की, लहान मुलाने मन जिंकलं. तर दुसऱ्या युजर्सने लिहीलं की, मुलं आपल्या वडिलांकडून शिकतात की, महिलांशी कसं बोलायचं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video seeing the makeover done by the mother the boy became exicited rmt
Show comments