Video Shows IndiGo Staff Argues With Passenger Over Luggage Damage : एका शहरातून दुसऱ्या शहरात आरामदायक, जलद मार्गाने प्रवास करण्यासाठी बरेच जण विमानाने जाणे पसंत करतात. विमानातून प्रवास करण्यापूर्वी तुमचे सामान विमानतळावर तपासले जाते. बॅगेत कपडे, मोबाइल चार्जर तर अनेक मौल्यवान वस्तूसुद्धा असतात; त्यामुळे या सामानाची काळजी घेणेसुद्धा तितकेच जबाबदारीचे काम असते. पण, आज सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका प्रवाशाबरोबर कर्मचारी गैरवर्तन करताना दिसले आहेत.
इंडिगो एअरलाइन्स सामानाच्या गैरव्यवहारासंबंधित कचाट्यात अडकला आहे. दिल्लीहून चेन्नईमार्गे बंगळुरूला जाणाऱ्या एका तरुणाने त्याचे सामान खराब झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राउंड स्टाफशी (कर्मचाऱ्याशी) संवाद साधला आणि यादरम्यान पुरावा म्हणून व्हिडीओसुद्धा रेकॉर्ड केला. पण, प्रवाशाचे म्हणणे ऐकण्याऐवजी, तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी, विमानतळावरील कर्मचारी प्रवाशाला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगत असल्याचे दिसले. त्यांच्यातील वाद वाढल्याने कर्मचाऱ्याने प्रवाशाचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर काय घडले व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
https://twitter.com/ShravanRajSiddi/status/1889700573399634308
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, प्रवाशाने सामानाबद्दल तक्रार केली असता कर्मचारी, ‘तुम्ही माझा व्हिडीओ काढू शकत नाही’ असे म्हणाला. नंतर वाद वाढल्यामुळे त्याने फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करूनसुद्धा पोलिसांना बोलावले आणि स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. प्रवाशाने त्याच्या तुटलेल्या हँडबॅगचे हँडल आणि खराब झालेली सुटकेस दाखवली. त्यानंतर तिने हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर शेअर केला आणि ‘व्वा, काय मदत केली आहे प्रिय इंडिगो, तुमच्या स्टाफची वागणूक पाहा. दिल्लीहून चेन्नईमार्गे बंगळुरू प्रवास करताना सर्व सामान खराब झाले आहे’ अशी व्यथा तिने कॅप्शनमध्ये मांडली आहे.
भरपाई म्हणून व्हाउचर देऊ केले…
व्हिडीओ व्हायरल होताच इंडिगोने प्रवाशाची माफी मागितली आहे आणि भरपाई म्हणून व्हाउचर देऊ केले. त्यानंतर विमान कंपनी इंडिगोने स्पष्ट केले की, लोडिंग आणि अनलोडिंग प्रक्रियेदरम्यान सामानाचे किरकोळ नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे होणारी निराशा लक्षात घेऊन सर, इंडिगो बरोबरच्या प्रवासादरम्यान तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो; अशी कमेंटसुद्धा पोस्टखाली केलेली दिसते आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShravanRajSiddi या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.