आजच्या काळामध्ये कोणत्याही घटनेचा व्हिडिओ क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहचतो. पण कित्येकवेळा व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्याआधीच तो प्रचंड व्हायरल होतो. असाच काहीसा प्रकार अलीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत घडला आहे. अलीकडेच, ओडिशाच्या झारीगाव गावातील सूर्या हरिजनन नावाच्या ज्येष्ठ महिलेचा, बँकेतून पेन्शन घेण्यासाठी तुटलेल्या खुर्चीचा आधार घेऊन अनवाणी चालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण या व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा ठरला आहे. या व्हिडिओचे सत्य समोर आले आहे.
या व्हिडिओबाबत स्थानिक अधिकारी आणि महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ”ती वृद्ध महिला बँकेत जात नव्हती तर त्यांच्या मुलीच्या घरून परत येत होती.”
जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओबाबत सांगितले सत्य
व्हायरल व्हिडिओमध्ये SBI च्या झारीगाव शाखेत जाऊन पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी या वृद्ध महिलेला संघर्ष करावा लागत असल्याचा दावा केला होता. पण याबाबत, नबरंगपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कमल लोचन मिश्रा यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, “व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि हा मुद्दा हाताबाहेर गेला.”
”खरंतर ही महिला तिच्या मुलीच्या घरून येत होती. आमच्या ब्लॉक सोशल सिक्युरिटी ऑफिसर आणि प्रोग्राम असिस्टंटने त्या महिलेला सरकारी वाहनात एसबीआय शाखेत नेले आणि तिला घरी सोडले,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा – काय सांगता! आता वडापाव देखील आला लिंक्डइनवर? Swiggy इंडियाची पोस्ट चर्चेत
वृद्ध महिलेच्या घरच्यांनी फेटाळला व्हिडिओतील दावा
मनीकंट्रोलने सूर्यो हरिजन यांची नात तनुजा हरिजन यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी याची पुष्टी केली. “माझी आजी आमच्या नातेवाईकाच्या घरून येत होती, बँकेत जात नव्हती,” असे तनुजा हरिजन यांनी सांगितले.
झरीगामचे ब्लॉक सामाजिक सुरक्षा अधिकारी पार्थजित मोंडल यांनीही सांगितले की, “१४ एप्रिल रोजी सूर्यो हरिजन आपल्या मुलीच्या घरातून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या बानुगुडा गावात जात होत्या. प्रवासाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली. हा संपूर्ण दावा खोटी होता. व्हिडिओ काही स्थानिक लोकांनी तयार केला होता.”
वृद्ध महिलेला मिळाली व्हिलचेअर
“दुसऱ्या दिवशी, 15 एप्रिलला, आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या महिलेला झारीगाम येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत नेले. 17 एप्रिल रोजी आम्ही ब्लॉक विकास अधिकारी आणि स्थानिक आमदारासोबत पुन्हा तिच्या घरी गेलो आणि तिला व्हीलचेअर दिली, ” असे मोंडल यांनी सांगितले.
एसबीआयने देखील दावा खोटा असल्याचे सांगितले
एसबीआयचे शाखा व्यवस्थापक अनिल कुमार मेहेर यांनीही हे वृत्त असत्य असल्याचे सांगितले. “वृद्ध महिला बँकेच्या शाखेत नव्हे तर तिच्या मुलीच्या घरून येत होती,” तो पुढे म्हणाला.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) चे सरचिटणीस रुपम रॉय यांनी या दाव्याचा निषेध केला. “एआयबीओसी एएनआयच्या बातमीचा तीव्र निषेध करते ज्यांनी एसबीआयला बदनाम केले आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना चुकीच्या पद्धतीने दाखवले,” असे रॉय यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेअर केला होता व्हायरल व्हिडिओ
या अहवालानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील व्हिडिओ ट्विट केला होता आणि परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि अधिकाऱ्यांना मानवतेने वागण्याचे आणि वृद्ध महिलेला मदत करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर, एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, बँकेने उपचारात्मक कारवाई केली आहे.
महिलेला घरपोहच मिळणार पेन्शनची रक्कम
“आमच्या ठरवलेल्या प्रोटोकॉलनुसार, जवळच्या शाखा SBI झारीगावने पेन्शनरच्या खात्यातून पेन्शनची रक्कम ताबडतोब भरली. त्यांना शाखा व्यवस्थापकाने आश्वासनही दिले आहे की, पुढे जाऊन पेन्शन त्यांच्या दारात पोहोचवली जाईल,” बँक स्टेटमेंटमध्ये जोडले आहे