Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्राण्यांचे व्हिडीओ अनेकांसाठी स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात, थोडक्यात सांगायचं तर दिवसभराचा थकवा मिटवण्यासाठी एखाद्या गोंडस मनीमाऊचा, किंवा इवल्याश्या कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ पाहणे हे अनेकांचे रुटीन आहे. अगदी पाळीव प्राणीच नव्हे तर आक्रमक व धडकी भरतील असे प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका भल्या मोठ्या आक्राळ विक्राळ शार्क व इवल्याश्या मानवाची भेट दिसत आहे. भल्या भल्या प्राण्यांना चक्क फाडून खाऊ शकेल अशी ताकद असणाऱ्या शार्कचे या व्हिडिओमधील रूप पाहून नेटकरी पार चकित झाले आहेत.
रेडइट वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की दोन स्कुबा डायव्हर्स खोल समुद्रात दिसून येत आहेत यावेळी अचानक त्यांच्यासमोर भलामोठा शार्क येऊन उभा राहतो. शार्क या दोघांच्या अत्यंत जवळ येऊन आपले भले मोठे तोंड उघडतो. काट्यासारखे तीक्ष्ण दात पाहून अगदी कोणाचाही थरकाप उडेल असा हा क्षण होता. पण या हुशार स्कुबा डायव्हर्सनी यावेळी संयम दाखवला. ते दोघेही अगदी स्थिर झाले. शार्कही शांत झाल्यावर यातील एकजण शार्कच्या डोक्यावर हळुवार हात फिरवतो व कमाल म्हणजे हा शार्क शांतपणे तिथून निघून जातो.
पाहा शार्क व स्कुबा डायव्हर्सची Viral भेट
Viral: फोटोतील ‘हा’ भयंकर प्राणी आहे साखरेहुन लहान; आताही तुमच्या घरी असू शकतो, ओळखा बरं..
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करण्यात आला आहे. यातील एका रेड इट युजरने सांगितल्याप्रमाणे हा मत्स्यालयातील व्हिडीओ आहे, इथे अनेक सँड टायगर शार्क आहेत. दातांमुळे अतिशय रागीट दिसत असले तरी हे अतिशय नम्र शार्क असतात असेही या युजरने सांगितले आहे. तर हा व्हिडीओ बघून तो शार्क कमी आणि खेळणं जास्त वाटत आहे असेही काहींनी म्हंटले आह.