Viral Video: आई होण्याचा आनंद जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठी लाखमोलाचा असतो. असं म्हणतात, स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती दुसऱ्यांदा नव्याने जन्म घेते. नऊ महिने आपल्या लेकराला उदरात वाढवून नंतर संपूर्ण आयुष्य त्याचे लाड पुरवण्यात, संस्कार करण्यात, त्याला तिच्या दृष्टीने जगाची ओळख करून देण्यात आईचा आनंद दडलेला असतो. काही महिलांना आई होण्याचं सुख लगेच लाभतं, तर काही जणींना अनेक वर्ष वाट पाहावी लागते. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील. आताही अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका कुटुंबात लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मुल जन्माला येणार असल्याचा आनंद साजरा करण्यात येत आहे.

या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्याना कुठल्यातरी सुखाच्या शोधात धावत असतो. काही जण खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, तर काही जण पैसा कमावण्याच्या मागे धावतात. प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी असते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी एक कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचले असून यावेळी त्या कुटुंबातील एका महिलेला हॉस्पिटलमधील नर्स डॉक्टरांकडून एक कागद आणून देते, ज्यावर ती प्रेग्नंट असल्याचे लिहिण्यात आले होते. यावेळी ती महिला हा कागद हातात घेते आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून रडायला सुरुवात करते. यावेळी तिला रडताना पाहून दुसरी महिला तिला सावरते. शिवाय यावेळी तिचा मागे उभा असलेला पतीदेखील रडायला सुरुवात करतो. या व्हिडीओवर या घरात १३ वर्षांनी पाळणा हलणार असल्याने आनंदाश्रू असे लिहिण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mi_tuzi_tu_maza या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले असून यावर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “एका स्त्रीला आई होण्याचे सुख हे कलेक्टर होण्याच्या सुखापेक्षा मोठे असते.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “१४ वर्षांनी मला दोन जुळी मुलं झाली, देव देतो पण खूप परीक्षा घेतो, सर्वात मोठी प्रॉपर्टी जर कोणती असेल तर ती आपली मुलं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती आनंद झाला असेल त्या माऊलीला.”

Story img Loader