जगात भयानक प्राण्यांची कमतरता नाही. सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता, मगरी इत्यादीं प्राणी धोकादायक प्राण्यांमध्ये होते, ज्यांना माणसाचा ‘शत्रू’ म्हणता येईल, कारण ते मांसाहारी प्राणी आहेत. कोणताही प्राणी दिसला की ते त्याला फाडून खाऊ शकतात. आपणही अशा प्राण्यांची भनक जरी लागली आजूबाजूला कधी तरी घाबरतो. विशेषत: मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. आज असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक झेब्रा अतिशय संथ गतीने नदी ओलांडत आहे. झेब्रा नदीच्या काठी पोहोचताच त्याने मागचे दोन्ही पाय बाहेर काढले. तेवढ्यात मगर तिथे येते आणि त्याच्यावर हल्ला करते. मात्र यादरम्यान झेब्रा मगरीच्या आवाक्याबाहेर निघून जातो. यावेळी मगरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. झेब्राला कळत नाही की धोकादायक मगर आपला पाठलाग करत आहे. इतक्यात महाकाय मगर झेब्राच्या दिशेने झेप घेते. मात्र तरीही ती झेब्राची शिकार करण्यात अपयशी ठरते. मग ती रागाच्या भरात पाण्यात जाते आणि लहान मुलासारखं आपले पाय पाण्यात मारते
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: चवताळलेला बैल हल्ला करण्यासाठी वेगात मागे धावू लागला, जीव वाचवण्यासाठी तरुणानं थेट…
हा व्हिडीओ ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.