सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक व्हिडीओ आवर्जून तयार केले जातात जे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पश्चाताप होतो. काही लोकांना असे विचित्र व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून नेटकरी दोन गटात विभागले आहे. नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये एका मोठ्या अजगराच्या विळख्यात एक व्यक्ती अडकला असून हसताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहीला तर काहींनी प्रसिद्धीसाठी असा व्हिडीओ केल्याचा दावा केला आहे.
अजगर त्यांच्या शिकारीला आपल्या विळख्यात जखडून मारण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. दरम्यान या व्हायरल क्लिपमध्ये, एक अजगराने जमिनीवर पडलेल्या माणसाव्यक्तीला विळख्यात पकडलेले दिसत आहे, सुरुवातीला तो माणूस संकटात आहे असे वाटते पण जस जसाकॅमेरा त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत जातो तेव्हा लक्षात येते की, तो माणूस प्रत्यक्षात हसत आहे आणि हात हलवत आहे. हे पाहून व्हिडीओ असे सूचित करतो की, हा अजगर त्याचा पाळीव प्राणी असू शकतो आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एक मुलगी देखील काही अंतरावर उभी असलेली दिसू शकते, ज्यामुळे हा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी शुट केल्याचे लक्षात येते. तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते आपला जीव धोक्यात टाकून अजगराबरोबर असा व्हिडीओ काढल्याबद्दल नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
“अॅनाकोंडाने व्यक्तीला जखडले” असे कॅप्शन देऊ wilda.nimalpower या इंस्टाग्राम खात्याद्वारे व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला ११,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि २००० हून अधिक वेळा शेअर केले गेले आहेत. कमेंटमध्ये ३०० हून अधिक लोकांनी कमेंट केली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! कॉलेज कॅन्टीनच्या जेवणात सापडले सापाचे तुकडे, विद्यार्थ्यांचा दावा; १०ते १५ जण रुग्णालयात दाखल
एका वापरकर्त्याने खिल्ली उडवली, “तो गुडबाय म्हणत आहे,” तर दुसऱ्याने चेतावणी दिली, “एक चुक अन् भाऊचा खेळ खल्लास!”, तिसऱ्या वापरकर्त्याने चिंता व्यक्त करत लिहिले, “त्यात हासण्यासारखे काय आहे? कदाचित तुला माहीत नसेल पण तुझा जीव धोक्यात आहे.” दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, “एक दिवस ते प्रत्यक्षात घडेल.” “जोपर्यंत ते मोठे सापाचे स्नायू आकुंचन पावत नाही तोपर्यंत हे सर्व मजेदार आणि खेळ वाटत आहे.”