भविष्यात होणारी तंत्रज्ञानाची प्रगती पाहून आपण थक्क होतो. याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भविष्यात मेट्रोचे स्वरूप कसे असणार आहे हे दिसत आहे. पण काहींनी मात्र ही संकल्पना पटली नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक महिला घरात बसलेली दिसत आहे. काही सेंकंदांनंतर घराच्या पृष्ठभागावरील काही भाग उघडताना दिसतो, ज्यावर खाली काचेचे आवरण असल्याचे दिसते. या काचेच्या आवरणामध्ये मेट्रोचे रुळ असलेले दिसत आहे. त्यामधून मेट्रो ट्रेन येते आणि काचेला असणाऱ्या वर्तुळातून लिफ्टप्रमाणे मेट्रोचा भाग पृष्ठभागावर येतो, आणि त्यातून एक चिमुकला बाहेर येतो. थेट घरातच पोहचवणारे हे भविष्यातील तंत्रज्ञान थक्क करणारे आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा: डॉक्टराची इंजेक्शन देण्याची पद्धत पाहिली का? लहान मुलंही होत आहेत आनंदाने सहभागी, पाहा Viral Video
व्हायरल होणारा हा व्हिडीओ तान्सू येगेन या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला ६६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना ही संकल्पणा पटली नसुन सुरक्षेतचा प्रश्न, यासाठी येणारा खर्च असे अनेक मुद्दे कमेंट्समध्ये उपस्थित केले आहेत.