Video Shows 100 Year Old Woman Enjoys A Bowl Of Maggi : आपल्यातील अनेक जण मॅगीप्रेमी आहेत; ज्यांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा अगदी रात्री-मध्यरात्री भूक लागली तरीही ते मॅगी बनवून खातात. काहींना भूक भागवण्यासाठी नूडल्स, पिझ्झाची गरज असते. पण, काही जण १० रुपयांची मॅगी खाण्यातच सुख मानतात. अगदी चिमुकले, तरुण मंडळी ठीक आहेत. पण, आज सोशल मीडियावर एका १०० वर्षीय आजींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे आणि त्यामध्ये आजी मॅगी खाण्याचा आनंद लुटताना दिसते आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) नातू आणि आजींचा मजेशीर संवाद दर्शवतो आहे. नातू आजीला, मॅगी खाणार का, असे विचारतो? त्यावर आजी “हो” म्हणते. “पण, मम्मीला सांगू नकोस”, असे नातू म्हणतो. त्यावर आजी “हो” म्हणते. त्यानंतर नातू आजीसाठी मॅगी बनवून आणतो आणि तिला खायला देतो. आजीसुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे मॅगी खाण्यास सुरुवात करते. सगळ्या मॅगी लव्हर तरुण मंडळींना मागे टाकणारा १०० वर्षीय आजीचा हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे म्हणतात. त्यामुळे या वयात खाण्या-पिण्याच्या, शरीराशी संबंधित अनेक समस्या या असतातच. पण, ज्येष्ठ नागरिकांच्या मनाचा विचार फारसा कुणी करताना दिसत नाही. त्यांना काय आवडते, काय नाही हे सोडून त्यांच्यासाठी काय योग्य आहे यालाच प्राधान्य दिले जाते आणि कुठेतरी हीच गोष्ट आजी-आजोबांच्या हट्टीपणाचे कारण ठरते. पण, आज व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, नातू आजीची खाण्या-पिण्याची आवड लक्षात घेऊन, रात्री तिच्यासाठी मॅगी बनवून आणतो आणि तिला खायला देतो.

कोणची नजर नको लागुदेत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jassi_baaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘ शनिवारी रात्री जेव्हा आजीला मॅगी खाण्याची क्रेव्हिंग होते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून प्रेमळ कमेंट्स करताना दिसत आहेत. ‘आजीला कोणाची नजर नको लागू देत, म्हातारपणी आपण पुन्हा लहान मुलं बनतो, माझ्या आजीलापण मॅगी खायला भरपूर आवडायची, मी अशी दिसेन जेव्हा मी म्हातारी होईन, मला व्हिडीओ पाहून आजीची आठवण आली आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

Story img Loader