Video Shows Grandfather Playing With Granddaughter : सध्या नातवंडांची जबाबदारी ही आजी-आजोबांकडे असते. आई-बाबा कामावर गेले की, दिवसभर ही नातवंडे आजी-आजोबांकडे असतात. स्वतःच्या मुलांपेक्षा आपल्या नातवंडांना जपणारे, त्यांचा सांभाळ करणारे आजी-आजोबा ही जवाबदारी अगदी आनंदाने स्वत:कडे घेताना दिसतात. रात्री झोपताना गोष्टी सांगणारे, हातावर खाऊसाठी पैसे ठेवणारे, आई-बाबा ओरडले की, मायेने आपल्याला जवळ करणाऱ्या आजी-आजोबांचे प्रेम शब्दात मांडणे कठीण असते असे म्हणायला हरकत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत नातं नव्या तिच्या ९६ वर्षीय आजोबांबरोबर खेळताना दिसते आहे. नव्याने तिची जंगलातील खोटे प्राणी जमिनीवर मांडून ठेवले आहेत आणि एकेक करून ती प्राणी उचलून आजोबांच्या हातात देताना दिसते आहे. तसेच आजोबा कोणताही कंटाळा किंवा कुरबुर न करता आजोबा सुद्धा तिच्याबरोबर खेळण्यात मग्न झालेले दिसत आहेत. पहाटे नाती बरोबर खेळणाऱ्या आजोबांचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

आजी-आजोबांबरोबर खेळण्याचे सुख हे शब्दात सांगण्या पलीकडे आहे. प्रत्येक नातवाला आपल्या आजी-आजोबांवर जीवापाड प्रेम असते. याचे उत्तम उदाहरण आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. चिमुकली तिच्या आजोबांबरोबर लहान खेळण्यांबरोबर आनंदाने खेळताना दिसते आहे. चिमुकली प्रत्येक वेळी ती हसते किंवा तिच्या कृतीतून आजोबांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आजोबांचा चेहरा आनंदाने उजळतो, जे पाहून तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि तुम्ही हा व्हिडीओ सारखा-सारखा बघाल एवढे तर नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @navyapatel_02 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘खऱ्या नात्याला किंवा बंधनाला वय कळत नाही’ नव्या तिच्या ९६ वर्षीय आजोबांबरोबर खेळते आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजोबांची आठवण आली आहे. तसेच काही जण हा क्षण पाहून ‘इंटरनेटचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ, मिस यु आजोबा, खूप कमी लोकांना आजोबांबरोबर खेळण्याचे सुख मिळते’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.