Video Shows Funny Agreement Sign Between Two Sister : आपल्या मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी नेहमी प्रेमाने वागणे, त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेणे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणे या बाबी भावा-बहिनीनाच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात. पण, सहसा बघायला गेले तर भाऊ-बहीण असो किंवा सख्या दोन बहिणी छोट्या-छोट्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडणे होतच असतात आणि ही भांडणे कधी-कधी अगदी टोकाला जातात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बहिणींमध्ये एक मजेशीर ॲग्रीमेंट झाल्याचे दिसते आहे.

व्हिडीओनुसार (Video) छोटी बहीण चिप्स खात असते. तेव्हा मोठी बहीण तिच्याकडे चिप्स खायला मागते. तर तेव्हा छोटी बहीण, मोठ्या बहिणीला काही चिप्स तर देते. पण, नंतर मात्र तिने एका वहीच्या पानावर ‘मी नव्याला माझ्या चिप्सच्या पाकिटातले अर्धे चिप्स दिले आहेत, जेव्हा नव्याकडे चिप्सचे पाकीट येईल तेव्हा मीसुद्धा त्यातले अर्धे चिप्स घेणार, असे हिंदीमध्ये लिहिले. त्यानंतर ती मोठ्या बहिणीला या कागदावर सहीसुद्धा करायला सांगते. बहीण सही करते का, ती छोट्या बहिणीच्या या मजेशीर गोष्टीवर कशी प्रतिक्रिया देते हे तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून नक्की बघा…

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://www.instagram.com/reel/DFiF5qjSur2/?igsh=MW11ZG9pd3c3M3EyZg%3D%3D

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, एखाद्या वकिलाप्रमाणे छोटी बहीण ॲग्रीमेंट करून घेते आहे. बहिणीने आपल्या चिप्सच्या पाकिटातले चिप्स खाल्ल्यामुळे ती रेकॉर्ड ठेवायचा म्हणून वहीच्या पानावर हे लिहून ठेवते आणि मोठ्या बहिणीला चिप्सचे पाकीट कोणी दिले, तर त्यातले अर्धे ती छोट्या बहिणीला देईल, असे एका कागदावर लिहून ठेवते आणि ती त्यावर मोठ्या बहिणीची सहीसुद्धा घेते. त्यानंतर हा सगळा मजेशीर किस्सा छोट्या बहिणीने मोबाईलमध्येसुद्धा रेकॉर्ड करून घेतला आहे, असेसुद्धा ती आवर्जून सांगते.

ही मोठी होऊन नक्कीच वकील बनणार…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @editoraltaaf या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘खूपच गंभीर मॅटर आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. “ही मोठी होऊन नक्कीच वकील बनणार”, “स्क्रोल करता करता या मजेशीर प्रसंगाचा साक्षीदार झालो”, “मीपण असं लहानपणी केलं आहे”, “ॲग्रीमेंट बनलं” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.

Story img Loader